पुणे पुन्हा हादरलं! अल्पवीयन मुलीची चाकूने वार करत हत्या

पुण्यात (Pune) काल रात्री तीन लोकांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची (Minor girls) चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे .
3 boys killed 14 years Kabaddi Player girl in Bibewadi Pune
3 boys killed 14 years Kabaddi Player girl in Bibewadi PuneDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे (Pune) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पुण्यात काल रात्री तीन लोकांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची (Minor girls) चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन कबड्डी सरावासाठी जात असताना ही घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्याच्या दूरच्या नातेवाईकाचे "एकतर्फी" प्रेम हे निर्घृण हत्येमागील कारण असू शकते. पुणे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे तसेच या घटनेनंतर दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात अली आहे. (3 boys killed 14 years Kabaddi Player girl in Bibewadi Pune)

ही घटना पुणे शहरातील बिबेवाडी (Bibewadi) परिसरातील आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन खेळाडू काल संध्याकाळी 5.45 च्या सुमारास कबड्डी सरावासाठी बिबेवाडी परिसरातील यश लॉन येथे जात होती . जेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत लॉनजवळ उभी होती, तेव्हा एका 22 वर्षांच्या मुलासह तीन जण मोटारसायकलवर आले.यापैकी 22 वर्षांच्या मुलासह दोन लोकांनी तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी तिच्यावर चाकूने अनेक वार केले. हा हल्ला इतका रानटी होता की पीडित अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की आम्ही 2 आरोपींना पकडण्यात यशस्वी झालो आहोत, जे अल्पवयीन आहेत, मात्र मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या फरार आहे. ते म्हणाले की, 22 वर्षीय आरोपी शुभम भागवत हा मृत अल्पवयीन किशोरचा दूरचा नातेवाईक आहे आणि तिच्या घरी राहायचा. त्याने सांगितले की 'तो मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला असल्याने, मुलीच्या पालकांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते.

3 boys killed 14 years Kabaddi Player girl in Bibewadi Pune
समीर वानखेडे -भाजप नेत्यांमध्ये भेट? नवाब मलिक करणार खुलासा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com