महाराष्ट्र बोर्ड पेपर लीक: बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला असुन, याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकालाही अटक केली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेत कथित पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी बारावी बोर्डाचा रसायनशास्त्राचा पेपर परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. 12th standard paper leaks in Maharashtra; private class owner arrested()
परीक्षा देण्यासाठी परीक्षा (Board Exam) केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आधीच प्रश्नपत्रिका होती. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकालाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी वर्गातील शिक्षकाने 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर व्हॉट्स अॅपद्वारे विद्यार्थ्यांना दिला. मुकेश यादव असे खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खासगी शिक्षकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी हा पेपर आपल्या वर्गातील तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपवर दिल्याचे समोर आले आहे. शनिवारी महाराष्ट्रात (Maharshtra) रसायनशास्त्राचा पेपर झाला. परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये परीक्षेचा पेपर फुटला होता. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शिकवणी शिक्षकाला अटक केली. तो मुंबईतील (Mumbai) मालाड परिसरात खासगी शिकवणी शिकवत असे आणि त्याच्या बारावीच्या वर्गात सुमारे 15 विद्यार्थी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.