Goa Today News Live: लुथरा बंधूंना दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांकडून अटक

Goa News Live 16 December 2025 Marathi Update: जिल्हा परिषद निवडणूक, नाताळ, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल, गुन्हे, राजकारण, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध घडामोडींच्या ताज्या अपडेट.
Goa Today's News Live
Goa Today's News LiveDainik Gomantak

लुथरा बंधूंना दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांकडून अटक

गोव्यातील हडफडे येथील एका प्रसिद्ध क्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणातील मुख्य संशयित लुथरा बंधूंच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना मोठे यश आले. थायलंडमधून हद्दपार केल्यानंतर, दिल्ली विमानतळावर उतरताच गोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

आयडीसीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सांकवाळमधील कंपनीत घुसून लंपास केला लाखो रुपयांचा मुद्देमाल

आयडीसी सांकवाळ इंडस्ट्रियल इस्टेटमधील आगम बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चोरट्यांनी घुसून सुमारे 4 लाख रुपयांच्या बॅटरी घेऊन पळ काढला. ही चोरी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 आणि 9 डिसेंबर रोजी दुपारी 12.00 या दरम्यान घडली. आगम बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेड, आयडीसी सांकवाळचे मालक आणि वास्को येथील रहिवासी प्रतीक गुप्ता यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; 5 दिवस चालणार सभागृह दणाणार

गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गोव्याचे राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या आठव्या विधानसभेचे बारावे अधिवेशन (हिवाळी अधिवेशन) बोलावले आहे. हे अधिवेशन सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

सर्वत्र खंडणी, भ्रष्टाचार! गोव्यातील आणखी एका भाजप नेत्याचा सरकारवर आरोप; केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

"गोव्यातील भाजपचे वरिष्ठ नेते उघडपणे म्हणत आहेत की, त्यांनी इतके भ्रष्ट सरकार कधीच पाहिले नाही... सर्वत्र खंडणी, पावला - पावलावर भ्रष्टाचार. भाजपच्या दोन मंत्र्यांनी यापूर्वी त्यांच्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत आणि आता आणखी एक नेता समोर आला आहे."

"भाजपमधूनच सत्य बाहेर येत असताना, भाजपने संपूर्ण व्यवस्थेला भ्रष्ट आणि बेईमान केले आहे हे स्पष्ट होते", असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी एका टीव्ही शोचा एक व्हिडिओ पोस्ट करत मत मांडले आहे.

विद्यापीठ निवडणूक रद्द; एनएसयुआयचा विरोध

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, आज १६ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून एनएसयुआयकडून निवडणूकी दिवशी हा निर्णय जाहीर केल्यााने विरोध नोंदविला आहे.

पणजीत मजुरावर प्राणघातक हल्ला, झारखंडच्या संशयिताला अटक

जुना पाटो पूल, पणजी येथे मजुरावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनेश कारंडे असे जखमी मजुराचे नाव आहे. अमनकुमार चौबे (रा. झारखंड) असे या हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने संशयिताला थांबविण्यात यश आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे. मजुर दिनेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधुंना थायलंडमधून डिपोर्ट करण्यात आले आहे. दोघेही दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर दाखल होणार असून, तेथून गोवा पोलिस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन लुथरा बंधुंना ताब्यात घेतील. यासाठी गोवा पोलिसांचे पथक आधीच दिल्लीत दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com