

पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात बुधवारी गोव्याच्या बॉक्सर्सचा सोनेरी जोश पाहायला मिळाला. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमानांनी बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझसह एकूण नऊ पदके जिंकून या खेळातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
खोर्ली - ओल्ड गोवा येथे टेम्पो आणि दिचाकीचा अपघात झाला असून, यात प्रियोळ येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. आकाश गावडे (वय 27, रा. प्रियोळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
गोव्यात बुधवारी पहाटे 05 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आकस्मित मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला.
गोव्यात बुधवारी पहाटे भरपूर पाऊस झाला, त्यामुळे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिमपूर्व दिनी होणाऱ्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले, नंतर वातावरण बदलले. यॉटिंग शर्यतीत खराब हवामानामुळे रद्द कराव्या लागल्या, तरी आकाश स्वच्छ झाल्यानंतर हॉकी, बीच हँडबॉल आदी आऊटडोअर स्पर्धेतील अंतिम सामने झाले.
या पार्श्वभूमीवर यजमान गोव्याने बॉक्सिंग, यॉटिंग, स्क्वे मार्शल आर्ट या खेळात सुवर्णपदकांची लयलूट केली.
गोव्यात बुधवारी पहाटे 05 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी काही प्रमाणात वाहतुकीवरदेखील परिणाम दिसून आला. आकस्मित मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला. क्रीडा ग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कदंब महामंडळाने 2018-19 ते 2022-23 या पाच वर्षांच्या कालखंडात विनातिकीट म्हणजेच फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 7 लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे. गेल्या पाच वर्षांत महिन्याला सरासरी 12 हजार, तर वर्षाला 1 लाख 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तांत्रिक शिक्षण संचालनालयाने गोवा सामाईक प्रवेश परीक्षा रद्द केली आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी आता JEE Main, NEET स्कोअर ग्राह्य धरला जाणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागील दोन दशकांपासून GCET परीक्षा आधार होता. परंतु आता ही परीक्षा घेतली जाणार नाही.
गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ट्रायथलॉन स्पर्धेतील दोन खेळाडूंना येथील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशने दंश केल्याची घटना घडली आहे.
तर अन्य एका ट्रायथलीटला या स्पर्धेदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती दृष्टी मरीन या सरकारने नेमलेल्या खासगी जीवरक्षक संस्थेने दिली आहे.
गोव्याच्या गौरव चौहान याने पुरुषांच्या बॉक्सिंगमधील सुपर हेवी गटात सुवर्णपदक जिंकले. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील गोव्याचे हे १७ वे सुवर्ण, तर बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक ठरले. अंतिम लढतीत गौरवने चंडीगडच्या सावन गिल याला हरविले. स्पर्धेत गोव्याची आता एकूण ६४ पदके झाली आहेत.
पणजीत झालेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी सांत इनेज परिसरात एक कार रस्त्यातील चिखलात अडकली. येथे खोदकाम सुरू होते. पण पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. चालक कार पार्क करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.
नानोडा बांबर येथे विष्णु जोशी यांच्या जागेत सापडलेल्या मध्ययुगीन नाण्यांची पाहणी पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाईंनी यांनी केली. पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी नानोडा येथे भेट दिली.
साळ नदीच्या किनाऱ्यावर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात केळशी पंचायत क्षेत्रात करण्यात आलेले बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाचा गोवा खंडपीठाने बांधकाम केलेल्या बार्रेटो नामक मालकाला दिले आहेत.
हे बांधकाम 15 दिवसात स्वतःच काढले जाईल, अशी हमी या मालकाने न्यायालयाला दिली आहे. त्याच्या कारवाईचा अहवाल जीसीझेडएमएला सादर करण्यास गोवा खंडपीठाने सांगितले आहे
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. पुरुष लाईट मिडलवेट गटात गोव्याच्या रजतने आणि महिला गटात गोव्याची बॉक्स साक्षी चौधरीने यांनी सुवर्णपदक पटकावले.
रजतने अंतिम लढतीत सेनादलाच्या आकाश याच्यावर विजय मिळवला. तर साक्षीने मध्यप्रदेशच्या मलायका हिचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली. गोव्याने या स्पर्धेत एकूण 16 सुवर्णपदके कमावली आहेत.
अवकाळी पावसामुळे पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील स्वयंपाक घरात पाणी साचले आहे. येथील संपुर्ण परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सध्या येथील साहित्य इतरत्र हलविले जात आहे. तथापि, येथील खेळावर परिणाम झालेला नाही.
खराब हवामानामुळे दोना पावला येथील हवाई बीचवरील ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यॉटिंग शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत गोव्याला ४ पदके मिळाली.
कात्या कुएल्हो व डेन कुएल्हो यांना सुवर्णपदक तर अद्वैत मेननला रौप्य आणि पर्ल कोलवाळकर हिला ब्राँझपदक मिळाले.
गोव्याची पदक संख्या आता एकूण ५५ वर पोहचली आहे. यात १४ सुवर्ण, १३ रौप्य, २८ ब्राँझपदकांचा समावेश आहे.
पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कांपाल येथे उभारण्यात क्रीडाग्राम आवारात पाणी साचले आहे. या क्रीडाग्राम आवाराचे तळ्यात रूपांतर झाले आहे.
ये-जा करणाऱ्या खेळाडू तसेच क्रीडाचाहत्यांची तारांबळ उडाली आहे. मात्र स्पर्धेवर त्याचा परिणाम नाही.
राज्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे ठिकठिकाणी 'नरकासूर'च्या तयारीवर पाणी ओतले गेले आहे. अनेक ठिकाणी नरकासूरच्या प्रतिकृती अर्धवट अवस्थेत तयार केलेल्या होत्या.
तथापि, काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे नरकासूर भिजले आहेत. अनेक तरूण मंडळांची मेहनत त्यामुळे पाण्यात गेली आहे.
नरकासूर स्पर्धेत या प्रतिकृती सहभागी केल्या जात असतात. आता तरूण मंडळांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने नरकासूर साकारावा लागणार आहे.
राज्यात पहाटे ५ वाजल्यापासून गडगडाटासह दमदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाद्वारे आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील २४ तासांत राज्यात सरसारी ५८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दाबोळीत सर्वाधिक ४ इंच पाऊस झाला आहे.
गोव्यात बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. कारापूर येथे एका लाँड्रीवर वीज कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र वित्तहानी झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.