ZIM vs NED: सिकंदर रझाने रचला इतिहास, दोनच दिवसांत मोडला 'हा' मोठा विक्रम!

Sikandar Raza Record: झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज सिकंदर रझाने मंगळवारी आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला.
Sikandar Raza
Sikandar RazaDainik Gomantak
Published on
Updated on

Sikandar Raza Record: झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज सिकंदर रझाने मंगळवारी आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. नेदरलँड्सविरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीत, रझाने पहिल्यांदा आपल्या गोलंदाजीने कमाल करुन दाखवली. त्याने ताबडतोब 4 बळी घेतले.

त्यानंतर झिम्बाब्वेच्या एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्याचा मान मिळवला. रझाने केवळ 54 चेंडूत शानदार शतक ठोकले. या शतकासह तो झिम्बाब्वेसाठी सर्वात वेगवान शतक ठोकणारा अव्वल खेळाडू ठरला.

55 चेंडू शिल्लक असताना संघाने दणदणीत विजय मिळवला

दरम्यान, 316 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या रझाने 54 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकार मारले आणि 188.89 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 102 धावा केल्या. या विस्फोटक फलंदाजीमुळे त्याने आपल्या संघाला 55 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, त्याने अवघ्या दोन दिवसांतच वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला.

Sikandar Raza
IND vs NED: नेदरलँडविरुद्ध भारत करणार अंतिम फेरित तिकीट निश्चित?

दोनच दिवसांपूर्वी शॉन विल्यम्सने सर्वात वेगवान शतक झळकावले होते

खरे तर, दोन दिवसांपूर्वी झिम्बाब्वेचा (Zimbabwe) अनुभवी फलंदाज शॉन विल्यम्सने नेपाळविरुद्ध 70 चेंडूत शतक झळकावले होते. यापूर्वी हा विक्रम ब्रँडन टेलरच्या नावावर होता, ज्याने 2015 च्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध 79 चेंडूत शतक झळकावले होते.

रझाने मंगळवारी दोघांचे रेकॉर्ड मोडले. रझा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो सर्व फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेसाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा ठरला आहे.

Sikandar Raza
ENG vs NED: IPL फॉर्म कायम, पाकनंतर नेदरलँडवर जोस बटलरचा कहर, 21 चेंडूत 112 धावा

दुसरीकडे, रझाने आपल्या गोलंदाजीत सलामीवीर विक्रमजीत सिंगला 88 धावांवर, मॅक्स ओ'डॉडला 59 धावांवर, वेस्ली बरेसीला 4 धावांवर आणि बास डी लीडला 4 धावांवर पाठवले. विशेष म्हणजे, यापैकी त्याने तीन फलंदाजांना धाडसी फटकेबाजी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com