Yusuf Pathan: 6,6,0,6,2.4...! युसूफ पठाणची बॅट पाकिस्तानी गोलंदाजाविरुद्ध तळपली, पाहा Video

Video: युसूफ पठाणने हरारेमध्ये एका टी10च्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजाविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली.
Yusuf Pathan
Yusuf PathanDainik Gomantak
Published on
Updated on

Yusuf Pathan slams 24 Runs In Over on Mohammad Amir bowling: भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण नेहमीच्या त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला गेला. त्याच्या याच आक्रमक फलंदाजीची झलक सध्या हरारेमध्ये सुरू असलेल्या झिम अॅफ्रो टी10 लीग स्पर्धेतही पाहायला मिळाली आहे.

युसूफ या स्पर्धेत जोहान्सबर्ग बफेलोज संघाकडून खेळत आहे. त्याने डर्बन कलंदर्स संघाविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना 8 व्या षटकात 24 धावा काढल्या. या षटकात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर गोलंदाजी करत होता.

Yusuf Pathan
Legends League Cricket 2022: युसूफ पठाण का म्हणाला- 'टाइगर अभी जिंदा है बेटा'

युसूफने या षटकात पहिल्या दोन चेंडूवर सलग 2 षटकार खेचले. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथ्या चेंडूवर पुन्हा युसूफने षटकार लगावला. यानंतर पाचवा चेंडू अमीरने वाईड टाकला.

त्यामुळे त्याला हा चेंडू पुन्हा टाकावा लागला. त्यावर 2 धावा आल्या, तर अखेरच्या चेंडूवर युसूफने चौकार मारला. त्यामुळे या संपूर्ण षटकात 25 धावा आल्या, त्यातील 24 धावा युसूफने काढल्या. त्याच्या या आक्रमक फलंदाजीचा व्हिडिओ सध्या व्हालरल होत आहे.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युसूफ नाबाद राहिला. त्याने 26 चेंडूत 80 धावांची खेळई केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 9 षटकार मारले. त्यामुळे जोहान्सबर्ग बफेलोज संघाने एक चेंडू बाकी ठेवून 6 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

Yusuf Pathan
MS Dhoni: धोनीचा विंटेज अंदाज! 1980 रोल्स रॉयस कारमधून रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका; Video व्हायरल

या सामन्यात डर्बन कलंदर्सने 10 षटकात 4 बाद 140 धावा केल्या होत्या. डर्बनकडून आंद्रे फ्लेचरने 39 धावांची खेळी केली, तर असिफ अलीने 32 धावा केल्या. जोहान्सबर्गकडून नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्याय

त्यानंतर 141 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 9.5 षटकात जोहान्सबर्ग बफेलोजने 4 बाद 142 धावा केल्या आणि सामना जिंकला. युसूफशिवाय जोहान्सबर्गकडून कर्णधार मोहम्मद हाफिज (17), विल स्मिद (16) आणि मुश्फिकुर रहिम (14) यांनी 2 आकडी धावसंख्या पार केली. डर्बनकडून तय्यब अब्बासने 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com