Zainab Abbas : 'माफी मागते की...' वर्ल्डकपदरम्यान भारतातून परतलेल्या पाकिस्तानी अँकरची पोस्ट व्हायरल

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू असतानाच पाकिस्तानची स्पोर्ट्स अँकर भारतातून निघून गेल्याने चर्चांना उधाण आले होते, त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.
Zainab Abbas
Zainab Abbas Twitter/ZAbbasOfficial
Published on
Updated on

Zainab Abbas open up on returned from India during ICC ODI Cricket World Cup 2023:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना शनिवारी अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी पाकिस्तानची स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बास चर्चेत आहे.

अब्बास 2023 चा वर्ल्डकप कव्हर करण्यासाठी आयसीसीच्या स्पोर्ट्स प्रेझेंटेटर्सच्या टीमचा भाग होती. तिने हैदराबादमध्ये झालेले पाकिस्तानचे सामनेही कव्हर केले होते. मात्र, सोमवारी ती अचानाक भारतातून निघून गेली. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता स्वत: अब्बासनेच समोर येत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

Zainab Abbas
'IND vs PAK सामन्यासाठी आता...' अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरची पोस्ट व्हायरल

तिने सोशल मीडिया पोस्टवर या प्रकरणावर तिची बाजू मांडली आहे. तिने लिहिले आहे की 'मला जो खेळ आवडतो, तो सादर करण्याची आणि त्यासाठी फिरण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी नेहमीत स्वत:ला नशीबवान समजते आणि कृतज्ञ आहे. यावेळीचे आणखी खास होते.'

'मी जितक्या वेळ होते (भारतात), त्यादरम्यान माझे सर्वांशी चांगले संभाषण झाले. मला या प्रवासात आनंद आणि कुटुंबिक भावना जाणवल्या, जे मला अपेक्षित होते.'

'मला कोणीही जाण्यासाठी सांगितले नव्हते आणि कोणीही मला हद्दपार केले नाही. तथापि, सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया समोर आल्या, त्याने मी घाबरले होते. जरी माझ्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता, तरी माझे कुटुंब आणि माझे दोन्ही देशातील मित्र काळजीत होते. जे काही झाले, त्यावर विचार करण्यासाठी आणि मला काही वेळ हवा होता.'

Zainab Abbas
IND vs PAK: अहमदाबादमध्ये महामुकाबला, पण पाकिस्तानसमोर असतील 'ही' 4 आव्हाने

तिने पुढे लिहिले, 'मला समजते आणि ज्या पोस्ट व्हायरल झाल्या त्यामुळे काही लोक दुखावले गेल्याबद्दल मला वाईट वाटले. मी हे स्पष्ट करते की माझ्या जुन्या पोस्ट माझ्या मुल्यांबाबत आणि मी जी व्यक्ती आहे, त्याबद्दल सांगत नाहीत. आशा भाषेसाठी कोणतीही माफी नाही, आणि मी जे दुखावले गेले आहेत, त्यांची मनापासून माफी मागते.'

तसेच तिने लिहिले की 'मी या कठीण काळात मला साथ देणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.'

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी झैनाबचे काही जुन्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. ज्यात हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावरून अब्बास ट्रोल झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com