Goodbye 2022: 'या' पट्ट्यानं 2022 मध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट्स, नाव जाणून तुम्हीही म्हणाल...

Team India: भारतीय क्रिकेटसाठी 2022 हे वर्ष फारसे खास राहिलेले नाही. या वर्षी टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप आणि आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
Yajuvendra Chahal
Yajuvendra ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

Most Wickets For Team India In 2022: भारतीय क्रिकेटसाठी 2022 हे वर्ष फारसे खास राहिलेले नाही. या वर्षी टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप आणि आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी, 2022 मध्ये भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संघाला विजय मिळवून दिला. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच 5 भारतीय गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, जे यावर्षी सर्वाधिक यशस्वी ठरले.

दरम्यान, अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमारने 2022 मध्ये 33 डावात एकूण 37 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारनंतर या यादीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) नाव आहे. बुमराहने यावर्षी 20 डावात गोलंदाजी करताना 39 विकेट्स घेतल्या.

Yajuvendra Chahal
Team India: बांगलादेशविरुद्ध कसोटी तर जिंकली, पण टीम इंडियासमोर उभे राहिलेत 'हे' यक्षप्रश्न

तसेच, मोहम्मद सिराजसाठीही हे वर्ष अतिशय संस्मरणीय ठरले. तो या वर्षात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. सिराजने 2022 मध्ये 27 डावात 41 विकेट्स घेतल्या. या वर्षात भारतासाठी अक्षर पटेल हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अक्षरने 35 डावात एकूण 42 विकेट घेतल्या आहेत. 2022 चा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल आहे. चहलने यावर्षी 32 डावात 44 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, यजुवेंद्र चहलने (Yajuvendra Chahal) या सर्व विकेट्स फक्त वनडे आणि टी-20 मध्ये घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com