Asia Cup 2023: फक्त चहलच नाही, तर 'या' 5 अनुभवी खेळाडूंचाही भारतीय संघातून झाला पत्ता कट

India Squad for Asia Cup 2023: आशिया चषकात भारतीय संघात निवड न झालेल्या ५ अनुभवी खेळाडूंचा घेतलेला आढावा
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak

Five players missed out from India squad for Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समीतीने सोमवारी (21 ऑगस्ट) 17 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा खेळली जाणार आहे.

आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात समतोल साधण्याचा निवड समितीने प्रयत्न केला आहे. पण असे असले तरी काही अनुभवी खेळाडूंना संघात जागा न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आशिया चषकात भारतीय संघात निवड न झालेल्या 5 अनुभवी खेळाडूंचा या लेखातून आढावा घेऊ.

Yuzvendra Chahal
Asia Cup 2023 India Squad: भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन

1. युझवेंद्र चहल - गेल्या अनेक वर्षांपासून युझवेंद्र चहल भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने भारताच्या अनेक विजयांमध्ये महत्त्वाचा वाटाही उचलला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत.

मात्र, त्याला 2023 मध्ये चहलला केवळ 2 वनडे सामन्यात संधी मिळाली आहे. यात त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. पण आशिया चषकासाठी त्याच्याआधी कुलदीप यादवला आधी पसंती देण्यात आली आहे.

२. आर अश्विन - आर अश्विन भारताचा कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. पण त्याची मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे तो भारताच्या वनडे संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा अनेकांना होती.

मात्र त्यालाही आशिया चषकासाठी संघात संधी मिळालेली नाही. आर अश्विनने त्याच्या वनडे कारकिर्दीत 113 सामने खेळले असून 151 विकेट्स घेतल्या आहेत.

३. शिखर धवन - भारतासाठी अनेकवर्षे सलामीला दमदार कामगिरी करणाऱ्या शिखर धवनलाही भारतीय संघात संधी मिळालेली नाही. याबरोबरच त्याच्यासाठी आता भारतीय संघाचे दारही बंद झाले असल्याचे म्हटले जात आहे.

शिखर गेल्यावर्षीपर्यंत भारताच्या वनडे सेटअपमधील महत्त्वाचा खेळाडू होता. मात्र, आता तो संघातून बाहेर झाला आहे. शिखरने त्याच्या कारकिर्दीत वनडेमध्ये 167 सामने खेळले असून 44.11 च्या सरासरीने 17 शतके आणि 39 अर्धशतकांसह 6793 धावा केल्या आहेत.

Yuzvendra Chahal
Asia Cup 2023: सूर्य उगवणार! टीम इंडियातून वगळल्यानंतर युझी चहलची सूचक पोस्ट व्हायरल

४. भुवनेश्वर कुमार - भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पण त्याला गेल्या दोन वर्षात दुखापतीमुळे बरेच क्रिकेट सामन्यांना मुकावे लागले. मात्र, त्यानंतर त्याने चांगले पुनरागमन केले होते.

त्याने गेल्या 7 वनडेत 9 विकेट्सही घेतल्या होत्या. पण त्यालाही आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत 121 वनडे सामने खेळले असून 141 विकेट्स घेतल्या आहेत.

५. वॉशिंग्टन सुंदर - 23 वर्षीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरलाही आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तो फिरकी गोलंदाजीबरोबरच तळात फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. मात्र त्यालाही संघात संधी मिळाली नाही.

सुंदरने त्याच्या कारकिर्दीत 16 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 16 विकेट्स घेतल्या असून एका अर्धशतकासह 233 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com