Cricket World Cup 2023: सलग तिसऱ्या वर्ल्डकपमध्येही संघात निवड नाही; आता याची सवयच झालीय...

लेगस्पिनर युझवेंद्र चहलने व्यक्त केली खंत
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal Dainik Gomantak
Published on
Updated on

Yuzvendra Chahal On not selected in Team India: भारताचा अव्वल लेगस्पिनर युझवेंद्र चहल भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. याआधी 2021 आणि 2022 मध्येही तो T20 वर्ल्ड खेळू शकला नव्हता.

म्हणजेच हा सलग तिसरा विश्वचषक आहे, ज्यामध्ये चहल खेळताना दिसणार नाही. 2022 च्या T20 विश्वचषकात तो भारतीय संघाचा भाग होता पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

(Cricket World Cup 2023)

Yuzvendra Chahal
Goa Charter Flights: ऑक्टोबरमध्ये गोव्यात येणार 25 चार्टर फ्लाईट्स; रशिया, कझाकिस्तान, इस्रायलचे पर्यटक येणार

दरम्यान, आता युझवेंद्र चहलने वर्ल्डकपसाठी संघनिवडीत त्याला दुर्लक्षित केल्यावरून आपले मत व्यक्त केले आहे. विस्डेन संस्थेशी बोलताना चहल म्हणाला की, आता मला वगळले जाण्याची सवय झाली आहे. हा माझ्या जीवनाचा एक भाग बनला आहे.

मी समजू शकतो की हा विश्वचषक आहे आणि केवळ 15 खेळाडूच संघाचा भाग असू शकतात. संघात तुम्ही १७-१८ खेळाडू घेऊ शकत नाही. मला पण वाईट वाटतंय पण आता आयुष्यात पुढे जाणं हेच माझं ध्येय आहे. मला आता त्याचे व्यसन लागले आहे. आता तीन विश्वचषक झाले आहेत.”

चहल म्हणाला की, त्यामुळेच मी येथे (केंट) आलो आहे. कारण मला क्रिकेट खेळायचे आहे, मग ते कोणत्याही प्रकारचे असो. मला लाल चेंडूवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळत आहे. मला भारतासाठी लाल चेंडूवर क्रिकेट खेळायचे आहे. हा माझ्यासाठी चांगला अनुभव आहे. सध्या मी फर्स्ट डिव्हिजन काऊंटी खेळत आहे.

Yuzvendra Chahal
Konkan Railway Trains: मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस रद्द; काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल...

दरम्यान, वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास भारताने आपल्या संघात एकूण 3 फिरकी गोलंदाज ठेवले आहेत.

यामध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांचा आधीच समावेश होता. तर अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी आर. अश्विनची संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आर. अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com