VIDEO: युजवेंद्र चहल वादाच्या भोवऱ्यात! आधी धनश्रीसोबत घटस्फोट अन् आता नको तो व्हिडिओ झाला 'लीक'

Yuzvendra Chahal Video: आयपीएल २०२६ चा हंगाम मैदानातील चुरशीपेक्षा खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या घटनांमुळे जास्त चर्चेत येत आहे.
Yuzvendra Chahal smoking video
Yuzvendra Chahal smoking videoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuzvendra Chahal Smoking Video in Flight

आयपीएल २०२६ चा हंगाम मैदानातील चुरशीपेक्षा खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या घटनांमुळे जास्त चर्चेत येत आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्या 'व्हेपिंग' प्रकरणानंतर आता भारताचा अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल एका मोठ्या वादात सापडला आहे. पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या चहलचा विमानात ई-सिगारेट पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि नियमांच्या उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अर्शदीपच्या व्हिडिओत चहलचे बिंग फुटले

ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह विमानात आपल्या सहकाऱ्याशी गप्पा मारतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. अर्शदीपच्या मागे असलेल्या सीटवर युजवेंद्र चहल आणि शशांक सिंह बसले होते. व्हिडिओ सुरू असताना चहलला आपण रेकॉर्ड होत आहोत याची कल्पना नव्हती आणि त्याच क्षणी तो ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. चूक लक्षात येताच हा व्हिडिओ तातडीने सोशल मीडियावरून हटवण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी तो डाऊनलोड करून व्हायरल केला होता.

Yuzvendra Chahal smoking video
OBC Reservation Goa Medical PG: ओबीसींना नवे 'वैद्यकीय दालन'! पदव्युत्तर क्लिनिकल शाखांतही आरक्षण; गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

विमान प्रवासाच्या सुरक्षेला धोका आणि DGCA चे नियम

विमानामध्ये धूम्रपान किंवा ई-सिगारेट (Vape) वापरणे हा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांनुसार गंभीर गुन्हा आहे. ई-सिगारेटमधील बॅटरीमुळे विमानात आग लागण्याचा धोका असतो, ज्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. चहलसारख्या जबाबदार खेळाडूने अशा प्रकारे सार्वजनिक सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कडक टीका केली जात आहे. आता या प्रकरणात DGCA अधिकृतपणे काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yuzvendra Chahal smoking video
Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष; रियान परागच्या पावलावर पाऊल?

काही दिवसांपूर्वीच रियान परागने ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर २५ टक्के मॅच फीची कपात आणि एक डिमेरिट पॉईंट देण्याची कारवाई केली होती. त्यावेळी बोर्डाने सर्व खेळाडूंना अशा प्रकारच्या वर्तणुकीबद्दल कडक इशारा दिला होता. मात्र, चहलने थेट विमानातच हे कृत्य केल्यामुळे बोर्ड आता अधिक कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये शिस्त जपण्यासाठी बीसीसीआय या प्रकरणाची दखल कशी घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com