VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Yashasvi Jaiswal Asitha Fernando clash: भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये दुसरा कसोटी सामना रंगला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर चुरशीची क्रिकेटिंग लढत पाहायला मिळाली.
Yashasvi Jaiswal Asitha Fernando clash
Yashasvi Jaiswal Asitha Fernando clashDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये दुसरा कसोटी सामना रंगला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर चुरशीची क्रिकेटिंग लढत पाहायला मिळाली. मात्र, भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आसिथा फर्नांडो यांच्यात झालेल्या वादामुळे सामन्याची चर्चा आणखी रंगली. यशस्वी बाद झाल्यानंतर दोन्ही खेळाडू आमनेसामने आले आणि काही क्षण मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं मैदानावर काय घडलं?

भारताच्या डावातील ५८व्या षटकात आसिथा फर्नांडोने यशस्वी जायसवालला ४५ धावांवर बाद केले. विकेट मिळाल्यानंतर फर्नांडोने जल्लोष केला, तर यशस्वी पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. मात्र, काही क्षणांनी यशस्वी पुन्हा मागे आला आणि त्याने फर्नांडोशी संवाद साधला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

या वादामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फर्नांडोने काही आक्षेपार्ह टिप्पणी केली असावी आणि त्यावर यशस्वीने प्रतिक्रिया दिली असावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, दोन्ही खेळाडूंनी या घटनेबाबत अधिकृतपणे नेमकी भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Yashasvi Jaiswal Asitha Fernando clash
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

अजय जडेजांनी यशस्वीला दिला सल्ला

या घटनेनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी यशस्वीच्या मैदानावरील वर्तनावर भाष्य केले. सोनी स्पोर्ट्सवर बोलताना त्यांनी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला चिडवणे किंवा मजा-मस्करी करणे याची एक मर्यादा असायला हवी, असे मत व्यक्त केले. जडेजा म्हणाला, “जर तुम्ही स्वतःवर हसू शकत नसाल, तर दुसऱ्यांवरही हसू नका. तुम्हाला एखादी गोष्ट सहन होत नसेल, तर मग इतरांशीही तसं करता नये.” जडेजाच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. 

शारीरिक संपर्क आणि मैदानावरील शाब्दिक देवाणघेवाण यामध्ये फरक असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, मैदानावरील वातावरणात विनोद किंवा स्लेजिंग केले जात असले तरी त्याला मर्यादा असणे आवश्यक आहे.

यशस्वीच्या प्रकरणावर बोलताना जडेजांनी यापूर्वीच्या एका प्रसंगाचाही संदर्भ दिला. त्यांच्या मते, मैदानावर प्रतिस्पर्ध्याशी विनोद किंवा मजा करताना भाषा आणि मर्यादा यांचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे. एखादा खेळाडू स्वतःवर झालेली टीका किंवा विनोद स्वीकारू शकत नसेल, तर त्याने इतरांवरही तशाच प्रकारच्या टिप्पणी करण्यापासून दूर राहावे.

त्यांचा हा सल्ला आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काही चाहत्यांनी जडेजांच्या मताचे समर्थन केले आहे, तर काहींच्या मते मैदानावरील आक्रमकता ही क्रिकेटचा भाग असून एखाद्या घटनेचे पूर्ण चित्र समोर आल्यानंतरच निष्कर्ष काढायला हवा.

पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी

दरम्यान, सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत ११७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शुभमन गिलनेही अर्धशतक करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली. यशस्वी जायसवालला मात्र ४५ धावांवर समाधान मानावे लागले.

रवींद्र जडेजाने ४३ धावांचे योगदान दिले, तर केएल राहुलच्या बॅटमधून १८ धावा आल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल आणि सारांश जैन भारताच्या डावाला पुढे नेत होते. मैदानावरील वादामुळे चर्चेत आलेल्या यशस्वीच्या फलंदाजीपेक्षा आता त्याच्या आणि फर्नांडोच्या वादावरच क्रिकेट चाहत्यांचे अधिक लक्ष लागले आहे.

Yashasvi Jaiswal Asitha Fernando clash
Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

वादापेक्षा क्रिकेटवर लक्ष देण्याची गरज

कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील आक्रमकता आणि शाब्दिक देवाणघेवाण नवीन नाही. मात्र, त्याची मर्यादा ओलांडली जाऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक असते. यशस्वी-फर्नांडो प्रकरणात नेमके काय बोलले गेले, हे अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतरच या वादाचे खरे कारण समोर येईल. सध्या मात्र अजय जडेजांच्या वक्तव्यामुळे या घटनेला नवा रंग मिळाला असून, सोशल मीडियावरही त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com