WTT Star Contender स्पर्धेचा गोव्यात थरार! भारताच्या शरथ, साथियन, मनिकासह ऑलिंपिक विजेत्यांचाही सहभाग

डब्ल्यूटीटी टेबल टेनिस स्पर्धा गोव्यात रंगणार असून ऑलिंपिक विजेते पहिल्यांदाच भारतात खेळणार आहेत.
Achanta Sharath Kamal | Manika Batra
Achanta Sharath Kamal | Manika Batra Dainik Gomantak
Published on
Updated on

WTT Star Contender Goa 2023: जागतिक टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कटेंडर स्पर्धा येत्या सोमवारपासून (27 फेब्रुवारी) गोव्यात खेळली जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने ऑलिंपिक विजेते मा लाँग व चेन मेंग भारतात प्रथमच खेळतील.

ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पाच मार्चपर्यंत स्पर्धेची चुरस असेल. एकेरीत यजमान भारताची मदार दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, साथियन ज्ञानशेखरन, पायस जैन, गोव्याचा वेस्ली दो रोझारियो यांच्यासह मनिका बत्रा हिच्यावर असेल. श्रीजा अकुला व सुहाना सैनी या भारतीय संघातील अन्य महिला खेळाडू आहेत.

Achanta Sharath Kamal | Manika Batra
WPL 2023: तयारी सुरू! मुंबई इंडियन्सची जर्सी लाँच, खेळाडूंची सरावालाही सुरुवात; पाहा फोटो

स्पर्धेच्या पात्रता फेरीतील लढती 27 व 28 रोजी होतील, तर स्पर्धेची मुख्य फेरी 1 ते 5 मार्च या कालावधीत खेळली जाईल. भारतात होणारी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेची टेबल टेनिस स्पर्धा आहे. स्तुपा स्पोर्टस ऍनालिटिक्स व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ यांच्यातर्फे गोवा सरकार व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येत आहे.

सध्याचा ऑलिंपिक विजेता मा लाँग याच्याव्यतिरिक्त जागतिक क्रमवारीतील अव्वल फॅन झेनडाँग, वँग चुकिन, तोमोकाझू हारिमोटो, ट्रल्स मारगॅर्थ हे पुरुष एकेरीत, तर जागतिक अव्वल मानांकित सून यिंगशा, ऑलिंपिक विजेती चेन मेंग यांच्यासह पहिल्या पाच क्रमांकावरील महिला टेबल टेनिसपटू स्पर्धेच्या एकेरीत खेळतील.

Achanta Sharath Kamal | Manika Batra
Indian Super League: बंगळूरकडून झालेल्या पराभवाची एफसी गोवा प्रशिक्षकांनी स्विकारली जबाबदारी, म्हणाले...

पुरुष दुहेरीत शरथ कमल व साथियन ज्ञानशेखरन, हरमीत देसाई व मानव ठक्कर, तर महिला दुहेरीत मनिका बत्रा व अर्चना कामत, श्रीजा अकुला व दिया चितळे यांच्यावर भारताची आशा असेल.

मिश्र दुहेरीत मनिका व साथियन, मानव व अर्चना, सुहाना व वेस्ली यांची जोडी भारतातर्फे खेळेल. पात्रता फेरीत भारतातर्फे पुरुष एकेरीत 13, तर महिला एकेरीत 15 खेळाडू खेळतील. यामध्ये मनुष शाह, सनील शेट्टी, हरमीत देसाई, अर्चना कामत, रीथ टेनिसन या प्रमुख भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com