वृद्धिमान साहा पुन्हा चर्चेत, बंगाल संघाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून झाला लेफ्ट

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक वृद्धिमान साहा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
Wriddhiman Saha
Wriddhiman SahaTwitter
Published on
Updated on

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मोसमानंतर रणजी करंडक नॉकआऊट सामन्यांपूर्वी त्याने बंगाल संघ सोडण्याचे संकेत दिले आहेत. साहाने बुधवारी रात्री संघाचा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला. (Wriddhiman Saha Updates)

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वृद्धीमान साहा सातत्याने चर्चेत आहे. प्रथम त्याला श्रीलंका कसोटी मालिकेतून वगळण्यात आले, त्यानंतर त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल वक्तव्य केले आणि तो चर्चेत आला. साहाचा गुजरात संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

Wriddhiman Saha
RCB च्या रजत पाटीदारने शतक झळकवत रचला नवा विक्रम

दरम्यान, पत्रकार बोरिया मजुमदार यांनी त्याला धमकी दिल्यावर साहाने होणाऱ्या चर्चांचा पर्दाफाश केला. त्यावर बीसीसीआयनेही पत्रकारावर कारवाई केली. IPL 2022 च्या मोसमात साहाने गुजरात टायटन्स (GT) साठी शानदार खेळी खेळली आणि नंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. गुजरातचा संघ आता अंतिम फेरीत पोहोचला असून तो विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरला आहे. फायनलच्या तीन दिवस आधी बंगाल संघाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्यानंतर साहा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा वृद्धीमान साहा वादात सापडला होता, तेव्हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अधिकाऱ्याने पत्रकारांसमोर एक विधान केले होते. अधिकाऱ्याने साहाच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे साहा खूप दुखावला गेला होता. त्यामुळेच त्याला बंगाल संघाकडून खेळायचे नाही, असे सांगितले होते.

साहाला त्या अधिकाऱ्याची माफी मागायची आहे

साहाने मंगळवारी आयपीएलमधील शेवटचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला. हा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्यापूर्वी साहाने प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, मोटेरा आता माझे घरचे मैदान आहे, ईडन गार्डन नाही. त्याचवेळी बंगाल संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी वृद्धिमान साहा यांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले असल्याची बातमी मिळाली आहे. मात्र, यातूनही काही निष्पन्न झाले नाही.

Wriddhiman Saha
न्यूझीलंडची स्टार महिला क्रिकेटर एमी सॅटरथवेटने निवृत्ती केली जाहीर

साहाने बंगाल बोर्डाच्या अध्यक्षांकडे एनओसी मागितली

CAB चे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी या संपूर्ण प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. खेळाडू आणि संस्था यांच्यात जे काही घडते ते खेळाडू आणि संस्था यांच्यातच काटेकोरपणे राखले गेले पाहिजे, असे ते म्हणाले होते. दुसरीकडे, सूत्रांनी सांगितले की साहाने अभिषेकशी बोलून बंगाल संघ सोडण्यासाठी एनओसी मागितली आहे. मात्र, अद्याप बंगाल क्रिकेट बोर्डाकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, आता साहानेही व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याची चर्चा रंगत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com