इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सीझनमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला गेला. यामध्ये आरसीबीचा स्टार खेळाडू रजत पाटीदारची तुफानी खेळी पाहायला मिळाली. त्याने नाबाद शतक झळकावून आरसीबीला 14 धावांनी विजय मिळवून दिला.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना आरसीबीने 86 धावांत तीन गडी गमावले. अशा वेळी 3 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारने दमदार शतक झळकावले. यासह त्याने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रमही केला आहे.
प्लेऑफमध्ये शतक करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू
रजत पाटीदारला अजून राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळालेले नाही. अशा खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू म्हणतात. आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. यापूर्वी, अनकॅप्ड खेळाडू असताना, देवदत्त पडिक्कल, पॉल वल्थाटी, मनीष पांडे आणि शॉन मार्श यांनीही आयपीएलमध्ये शतके झळकावली आहेत.
जे कोहली, डिव्हिलियर्सही करू शकले नाहीत, ते रजतने करून दाखवले. आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेलसारखे खेळाडूही आतापर्यंत हे काम करू शकलेले नाहीत. तसेच प्लेऑफमधील हे पाचवे शतक ठरले. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, वृद्धिमान साहा, मुरली विजय यांनीही शतके झळकावली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.