Wrestling National Championship: क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय, नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा केली रद्द

Wrestling National Championship Canceled In Gonda UP: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणारी राष्ट्रीय खुली कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
Brijbhushan Sharan Singh
Brijbhushan Sharan SinghDainik Gomantak

Wrestling National Championship Canceled In Gonda UP: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणारी राष्ट्रीय खुली कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. याचा संबंध रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपाशी जोडला जात आहे. शनिवारी क्रीडा मंत्रालयाने या निर्णयाची माहिती दिली. देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर ब्रिजभूषण यांच्याविरोधात निदर्शने सुरु केली आहेत. कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी ब्रिजभूषण शरण सिंह गोंडा येथे पोहोचले तेव्हा वाद वाढला. त्यानंतर तिथे कुस्ती खेळताना अनेक खेळाडूंनी भाजप (BJP) खासदार सिंह यांना विरोध केला. इतकेच नाही तर अनेक खेळाडू सामना न खेळताच माघारी फिरु लागल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रद्द करण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Brijbhushan Sharan Singh
Brijbhushan Sharan Singh: 'माझ्या हातून एकच हत्या झाली...', ब्रिजभूषण यांनी ऑन कॅमेरा दिली कबुली

तत्पूर्वी, क्रीडा मंत्रालयाने शनिवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित केले. तर, क्रीडा संस्थेचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मंत्रालयाने सिंग यांच्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गढी, गोंडा येथे सुरु होणारी ओपन चॅम्पियनशिपही रद्द केली.

Brijbhushan Sharan Singh
Brijbhushan Sharan Singh अडकले, लैंगिक आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

दुसरीकडे, शुक्रवारी उशिरा झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी यांच्यासह देशातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी सिंह आणि डब्ल्यूएफआयवर लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com