Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचा विरोध सुरुच आहे. कुस्तीपटूंनी इतर खेळाडूंना साथ देण्याचे आवाहन केले आहे. यातच, आता माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि इरफान पठाण यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
दरम्यान, विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंचा संघर्ष पाहून ट्वीट करत कुंबळे म्हणाले की, “28 मे रोजी आमच्या कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. योग्य चर्चेतून कोणतीही गोष्ट सोडवली जाऊ शकते. लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे."
दुसरीकडे, इरफान पठाणनेही रविवारी रात्री ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. इरफान म्हणाला की, ''आमच्या खेळाडूंचे हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटते. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघावा.''
तसेच, कुस्तीपटूंचा विरोध जानेवारीपासून सुरु झाला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूसह अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सुमारे महिनाभरापूर्वी, कपिल देव, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), हरभजन सिंग आणि शिखा पांडे हे क्रिकेटपटू होते, ज्यांनी सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी करत भारतातील अव्वल कुस्तीपटूंनी केलेल्या निषेधाबद्दल मत व्यक्त केले होते.
या प्रकरणात बुधवारी एक मोठी अपडेट समोर आली. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनी एएनआयला सांगितले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्यासाठी अद्याप त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत.
15 दिवसांत न्यायालयात अहवाल सादर केला जाईल. हे आरोपपत्र किंवा अंतिम अहवाल देखील असू शकतो. सध्या कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा दावा सिद्ध करणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.