IND vs PAK: भारत-पाक क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या मैदानाला बनवलं होतं 'आखाडा', चाहते हे 5 मोठे वाद कधीच विसरु शकत नाहीत!

Gautam Gambhir And Shahid Afridi: एकदिवसीय विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभूत झालेला नाही. शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये आमनेसामने आले होते.
Gautam Gambhir And Shahid Afridi
Gautam Gambhir And Shahid AfridiDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये उद्या (शनिवारी) भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याच्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

एकदिवसीय विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभूत झालेला नाही. शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये आमनेसामने आले होते, जिथे भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यावेळीही टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

टीम इंडिया आपला 7-0 असा रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी, पाकिस्तानलाही आपला खराब रेकॉर्ड सुधारण्याची चांगली संधी आहे. दोन्ही संघात मोठे खेळाडू आहेत, जे एकटे सामन्याचं रंग रुप पालटू शकतात.

दरम्यान, सामन्यांपेक्षा भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमधील वादांचीच अधिक चर्चा होते. चला तर मग भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील काही वादांवर एक नजर टाकूया...

बर्मिंगहॅममध्ये 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, राहुल द्रविडची पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरशी वादावादी झाली होती.

झालं असं की, राहुल द्रविडने (Rahul Dravid) शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर चेंडू सीमारेषेकडे पाठवला. दरम्यान, द्रविड दोन धावा काढण्यासाठी वेगाने धावला, पण त्याचदरम्यान अख्तर त्याच्यामध्ये आला. धाव पूर्ण करत असताना द्रविड चेंडू पाहत होता त्याचदरम्यान शोएबला तो धडकला.

यामुळे संतापलेल्या राहुल द्रविडने अख्तरला मार्गातून हटण्यास सांगितले, दरम्यान शोएबला राग आला आणि तो द्रविडला काहीतरी बडबडला. त्यानंतर राहुल आणि शोएबमध्ये वाद वाढला. पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हकने जेव्हा वाद वाढत असल्याचे पाहिले तेव्हा त्याने दोघांना वेगळे केले.

विशेष म्हणजे, हा सामना पाकिस्तानने तीन विकेट्सने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने राहुल द्रविडच्या 67 धावा आणि अजित आगरकरच्या 47 धावांच्या जोरावर 200 धावा केल्या. युसुफ योहानाच्या 81 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने शेवटच्या षटकात 4 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता.

Gautam Gambhir And Shahid Afridi
World Cup 2023: अहमदाबादमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान थरार! जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

दरम्यान, 2007 मध्ये जेव्हा पाकिस्तान (Pakistan) संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये 5 वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात खूप शिवीगाळ झाली होती.

शाहिदच्या गोलंदाजीवर गंभीर धाव घेण्यासाठी धावत होता, त्याचदरम्यान दोघांची टक्कर झाली आणि आफ्रिदीने हे जाणूनबुजून केले असे गंभीरला वाटले. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली.

2010 च्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला शेवटच्या 7 चेंडूत 7 धावा कराव्या लागल्या होत्या. अशा स्थितीत शोएब अख्तरने हरभजन सिंगला त्रास देणारा चेंडू टाकल्यानंतर त्याला चिथावणी दिली होती.

ज्यानंतर दोघांमध्ये मैदानावरच जोरदार वादावादी सुरु झाली. यानंतर हरभजनने आमिरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला होता. विजय मिळवून दिल्यानंतर हरभजनने शोएब अख्तरवरही राग व्यक्त केला होता.

Gautam Gambhir And Shahid Afridi
World Cup 2023: बांगलादेशच्या फलंदाजांवर फर्ग्युसन भारी, बोल्टने केला मोठा रेकॉर्ड!

2003 मध्ये झालेल्या एका सामन्यात शोएब अख्तर वीरेंद्र सेहवागवर एकामागून एक बाउन्सर फेकत होता, जेणेकरुन तो शॉट खेळून आऊट होऊ शकेल.

शोएबच्या हरकतीने हताश झालेला सेहवाग अख्तरकडे गेला आणि म्हणाला, हिंमत असेल तर सचिनला बाउन्सर टाक... यानंतर सचिनने शोएबच्या बाऊन्सरवर षटकार मारला तेव्हा सेहवाग म्हणाला, 'बाप बाप असतो आणि मुलगा मुलगा असतो.'

Gautam Gambhir And Shahid Afridi
World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धुतलं, पहिल्या दोन सामन्यात केल्या रेकॉर्डब्रेक धावा!

2010 च्या आशिया चषकादरम्यान, पाकिस्तानी यष्टीरक्षक कामरान अकमल गौतम गंभीरला तो फलंदाजी करत असताना त्याच्याविरुद्ध अनावश्यक अपील करुन त्रास देत होता. त्यानंतर गंभीर आणि अकमल यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर धोनीला हस्तक्षेप करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com