World Boxing Championship मध्ये भारतीय बॉक्सर्संनी रचला इतिहास, देशासाठी जिंकली 3 पदके

World Boxing Championship: उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने तीन पदके जिंकून इतिहास रचला आहे.
Boxer
BoxerDainik Gomantak

World Boxing Championship: उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने तीन पदके जिंकून इतिहास रचला आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीच्या लढतीत तिन्ही भारतीय बॉक्सर्संना नशीब साथ देत नव्हते. मात्र या स्पर्धेच्या इतिहासातील पुरुष बॉक्सर्सची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

याआधी 2019 मध्ये अमित पंघालने रौप्य पदक आणि मनीष कौशिकने कांस्यपदक जिंकले आणि ही भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

पण यावेळी भारतीय बॉक्सर दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन आणि निशांत देव यांनी एकाच दिवसात तीन पदके मिळवली.

दरम्यान, 51 किलो गटात दीपक, 57 किलो गटात हुसामुद्दीन आणि 71 किलो गटात निशांत सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्यापासून वंचित राहिला.

हुसामुद्दीनला दुखापतीमुळे वॉकओव्हर द्यावा लागला, तर निशांत आणि दीपक यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

निशांतचा उपांत्य फेरीचा सामना पुनरावलोकनासाठी गेला आणि पंचांनी 2022 आशियाई चॅम्पियन आणि 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता कझाकिस्तानच्या (Kazakhstan) अस्लानबेक शिमबर्गायनोव्हच्या बाजूने निकाल दिला.

दुसरीकडे, भोरियाला दोनवेळच्या कांस्यपदक विजेत्या फ्रान्सच्या बिलाल बेनामाने रोमहर्षक विभाजनाच्या निर्णयात 4-3 ने पराभूत केले.

Boxer
World Boxing Championships: निखतचा दुसऱ्यांदा 'सुवर्णपंच'! व्हिएतनामची बॉक्सर फायनलमध्ये चीतपट

हुसामुद्दीनला दुखापत झाली

2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या अमित पंघालच्या संघात भोरियाची निवड झाली. तत्पूर्वी, गुडघ्याच्या दुखापतीमुळे हुसमुद्दीनने उपांत्य फेरीतून माघार घेतली होती. निजामाबादच्या 29 वर्षीय हुसमुद्दीनला बल्गेरियाच्या जे डियाझ इबानेझ विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली.

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने एका निवेदनात म्हटले की, हुसामुद्दीनला दुखापतीमुळे त्याच्या प्रतिस्पर्ध्याला वॉकओव्हर द्यावा लागला.

त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याला पुढे न खेळण्याचा सल्ला देण्यात आला. हुसामुद्दीन पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळत आहे. उपांत्य फेरीत तो क्युबाच्या सीडेल होर्टाविरुद्ध खेळणार होता.

Boxer
Women's Boxing Championships: भारताच्या निखत, नीतू, लवलिनाची फायनलमध्ये धडक! पदकही पक्के

भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाचे चित्र कसे बदलले?

भारतीय बॉक्सिंग संघात सात महिन्यांपूर्वी हाय परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून सामील झालेल्या बर्नार्ड ड्युनच्या नेतृत्वाखालील बॉक्सर्सची ही उत्कृष्ट कामगिरी आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) एकाही पुरुष बॉक्सरने देशासाठी पदक जिंकले नव्हते. त्यानंतर ड्युनेने अप्रतिम काम केले, त्याचा परिणाम ताश्कंदमध्ये पाहायला मिळत आहे.

उपांत्यपूर्व फेरीत दीपक भोरियाने किर्गिस्तानच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करुन शानदार विजय नोंदवला.

दुसरीकडे, हुसामुद्दीनने बल्गेरियाच्या डियाझ इबानेझचा 4-3 असा पराभव केला. तर निशांत देवने क्युबाच्या जॉर्जचा 5-0 असा पराभव करुन देशासाठी तिसरे पदक निश्चित केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com