रेल्वेचा महिला संघ गोव्यास भारी

विजयासह राष्ट्रीय सीनियर फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
Goa Football
Goa Football Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल (Football) स्पर्धेत रविवारी रेल्वेचा संघ गोव्याला भारी ठरला. सुप्रिया रौतरे हिच्या शानदार हॅटट्रिकच्या (hat-tricks) बळावर 4-2 फरकाने विजय नोंदवत रेल्वेने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

सामना केरळमधील (Kerala) कोझिकोड येथे झाला. गोव्याने सामन्यात आघाडी घेतली, मात्र नंतर सुप्रियाच्या धडाकेबाज खेळामुळे रेल्वेचे पारडे जड झाले. सुश्मिता जाधव हिने 33 व्या मिनिटास गोव्यास आघाडी मिळवून दिली. नंतर सुप्रिया हिने विश्रांतीपूर्वी 45+1 व्या मिनिटास रेल्वेला बरोबरी साधून दिली.

Goa Football
राज्य संघात सहकारी तर चॅलेंजरमध्ये प्रतिस्पर्धी !

सुप्रिया हिने हॅटट्रिकचा मान मिळविताना अनुक्रमे 56 व 58 व्या मिनिटास गोल केला. त्यामुळे रेल्वेला उत्तरार्धात 3-1 अशी आघाडी मिळाली. ममता हिने 69 व्या मिनिटास गोल करून रेल्वेची आघाडी 4-1 अशी भक्कम केली. सुश्मिता हिने 90+1 व्या मिनिटास सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून गोव्याची पिछाडी 2-4 कमी केली, पण रेल्वेचा धडाका रोखणे जमले नाही.

गोव्याने स्पर्धेच्या ड गट साखळी फेरीत अपराजित कामगिरी नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ज्युलियट मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने गट साखळीत दोन विजय व एक बरोबरी नोंदविली होती. मात्र रेल्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात गोव्याला माघार घ्यावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com