Sanjula Naik
Sanjula NaikDainik Gomantak

राज्य संघात सहकारी तर चॅलेंजरमध्ये प्रतिस्पर्धी !

शिखा पांडे (Shikha Pandey) आणि संजुला नाईक या गोव्याच्या महिला क्रिकेट संघातील सहकारी, मात्र शनिवारी सीनियर महिला चॅलेंजर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत दोघी प्रतिस्पर्धी ठरल्या.
Published on

पणजी: कसोटीपटू शिखा पांडे (Shikha Pandey) आणि संजुला नाईक (Sanjula Naik) या गोव्याच्या महिला क्रिकेट संघातील (Goa women's cricket team) सहकारी, मात्र शनिवारी सीनियर महिला चॅलेंजर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत दोघी प्रतिस्पर्धी ठरल्या. शिखाने संजुलास बाद करून योगायोग साधला. चॅलेंजर स्पर्धेस शनिवारपासून आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) विजयवाडा येथे सुरवात झाली. शिखा या स्पर्धेत भारत क संघाचे नेतृत्व करत आहे, तर संजुला भारत ड संघाची सदस्य आहे. पूजा वस्त्रकार हिच्या नेतृत्वाखालील ड संघाने शिखाच्या संघावर 40 धावांनी विजय मिळविला. ड संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 251 धावा केल्या. त्यावेळी शिखा व संजुला आमनेसामने आल्या. संजुलाने 41 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या.

Sanjula Naik
Goa: सुयशच्या अनुपस्थितीत मंथनकडे नेतृत्व

शिखाच्या गोलंदाजीवर धारा गुज्जर हिच्या हाती झेल देऊन संजुला बाद झाली. शिखाने डावातील 10 षटकांत 48 धावा देत 2 विकेट मिळविल्या. नंतर तिच्या नेतृत्वाखालील संघाचा डाव 211 धावांत आटोपला. फलंदाजीत शिखाला फक्त तीन धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com