Wisden World Test Championship Team: विस्डेन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा संघ जाहीर, ऋषभ पंतचाही समावेश

Wisden World Test Championship playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना जूनमध्ये ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
Rishabh Pant
Rishabh Pantdainik gomantak

Wisden World Test Championship playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना जूनमध्ये ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा अद्याप झालेली नाही.

या सगळ्यात विस्डेनने 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा संघ जाहीर केला आहे. या संघात विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचाही समावेश करण्यात आला आहे. पंतशिवाय टीम इंडियाचे दोन खेळाडूही या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

या तीन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले

विस्डेनने 2021-2023 मध्ये झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या आधारे 11 खेळाडूंची निवड केली आहे.

टीम इंडियामधून रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात आहे.

त्याचबरोबर भारताचे इतर स्टार फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांना संघात स्थान मिळालेले नाही.

Rishabh Pant
Rishabh Pant: स्वत: ब्रश करण्यातदेखील आनंद मिळतो; अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच बोलला

या देशांतील खेळाडूंचाही समावेश

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या संघातून दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चांदीमल यांना स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

फायनल 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवली जाईल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यासाठी संघ सादर करण्याची अंतिम तारीख 7 मे आहे.

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पण गेल्या वेळी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Rishabh Pant
Rishabh Pant: 'तू फायटर आहेस...' टीम इंडियाकडून पंतसाठी इमोशनल मेसेज, पाहा Video

उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लॅबुशाग्ने, दिनेश चांदीमल, जॉनी बेअरस्टो, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा, नॅथन लायन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com