Banned Things In FIFA WC 2022: गोलनंतर सेलिब्रेशन करताना टी-शर्ट काढण्यास बंदी; स्पर्धाकाळात 'या' गोष्टींवर निर्बंध

कोरोना टेस्ट, मास्कची गरज नाही; कपड्यांपासून ते मद्यापर्यंत विविध नियम
Banned Things In FIFA WC 2022
Banned Things In FIFA WC 2022Dainik Gomantak

Banned Things In FIFA WC 2022: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकानंतर होणारी दुसरी सर्वांत मोठी बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. कोरोनाचे संकट अद्याप पूर्ण टळलेले नसले तरी कतारमध्ये होणारी ही विश्वकरंडक स्पर्धा निर्बंधमुक्त आहे, तरीही सामाजिक आणि पारंपरिक नियमांची चौकट स्पर्धेच्या निमित्ताने कतारमध्ये येणाऱ्या सर्वांना असणार आहे. कपड्यांपासून ते मद्यापर्यंत हे नियम आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कतार देशाने कंबर कसली आहे. जवळपास जगभरातून 1.5 कोटी प्रेक्षक येण्याचा अंदाज आहे. त्यांची गैरसोय होऊ न देता कोरोनाबाबत काळजी घेत तरीही नियमांच्या सीमा आखण्याचा हा खटाटोप...

Banned Things In FIFA WC 2022
Controversial Moments In FIFA WC: केवळ मॅराडोनाचा 'हँड ऑफ गॉड'च नाही; तर 'हे' क्षणही फिफा वर्ल्डकपमध्ये ठरले वादग्रस्त

कतारला येण्यापूर्वी कोरोना चाचणीची गरज नाही. तसेच येथे आल्यावरही कोरोना चाचणी आवश्यक नाही, परंतु कतारमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्यास विगलीकरणाचे नियम पाळावे लागतील. कतारमध्ये फिरताना मास्कची गरज नाही, परंतु रुग्णालय किंवा हेल्थ सेंटरमध्ये गेल्यावर मास्क अनिवार्य आहे.

कतारच्या वैद्यकीय मंत्रालयाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी एतेराझ नावाचे अॅप तयार केले आहे. कतारमध्ये हे अॅप मोबाईलमध्ये घेणे अत्यावश्यक आहे.

हाय्या कार्ड

स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटक, संघाचे पाठीराखे या सर्वांना ओळखपत्रासाठी हाय्या कार्ड घेणे अनिवार्य आहे. फॅन झोनपर्यंत स्थानिक वाहतूक वापरायची असल्यास हाय्या कार्डनेच प्रवेश दिला जाणार आहे.

आरोग्य विमा

सरकारी रुग्णालयात मोफत उपचारासाठी पर्यटकांनी ‘पर्यटन तत्काळ आरोग्य विमा’ यासाठी नोंदणी करावी, परंतु हाय्या कार्ड असणे गरजेचे.

ड्रेसकोड

कतार हे मुस्लीम राष्ट्र असल्यामुळे येथे कपडे वापरण्यासाठी काही कडक नियम आहेत. स्थानिक संस्कृतीचा आदर ठेवण्यासाठी, सार्वजनिक जागा, मॉल अशा ठिकाणी परदेशी व्यक्तींनी व्यवस्थित कपडे परिधान करण्याचे बंधन आहे. खांदा पर्यंत बाह्या असाव्यात. गुडघ्याच्या पुढे पँट असाव्यात. केवळ जलतरण तलावाताच ‘स्वीमिंग कॉश्च्युम’ वापरण्यास परवानगी आहे.

Banned Things In FIFA WC 2022
FIFA World Cup 2022: युद्ध रशिया-युक्रेनचे; ताप पोलंडच्या फुटबॉल टीमला

टी-शर्ट काढण्यावर निर्बंध

स्टेडिअममध्ये ‘टी-शर्ट’ काढण्यास बंदी असणार आहे. या नियमाचा फटका खेळाडूंना बसू शकेल. कारण गोल केल्यावर किंवा सामना संपल्यावर ‘टी-शर्ट’ काढणे हे फुटबॉलमध्ये सर्रास होत असते.

मद्यबंदी

कतारमध्ये येताना मद्य आणण्यास मुळातच बंदी आहे, परंतु मद्य प्राशनाचा ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांना रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्येच मद्य प्राशन करण्याची परवानगी.

ड्रग आणि सिगारेट

उत्तेजक द्रव्य किंवा पदार्थांचे सेवन हा कतारमध्ये गुन्हा आहे. त्यामुळे अशी कृती कोणाकडूनही स्पर्धेदरम्यानही खपवून घेतली जाणार नाही. कैद तसेच मोठा आर्थिक दंड अशी शिक्षा आहे. इलेक्ट्रिक सिगारेटवरही बंदी आहे.

छायाचित्रण

उत्साहाच्या भरात नजरेस पडेल त्याचे छायाचित्रण करण्याची हौस कतारमध्ये महागात पडू शकेल. सरकारी बिल्डिंग, सैन्याचा कॅम्पस, औद्योगिक क्षेत्र यांचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केल्यास मोठी शिक्षा होऊ शकते.

औषधे

स्वतःच्या मर्जीनुसार कोणालाही कोणतीही औषध येथे मिळणार नाहीत. डॉक्टरांनी सूचना केलेली औषधेच देण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com