भारतीय महिला हॉकी संघाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या माजी कोचचे वेतन स्थगित

का थांबविण्यात आले भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कोचचे वेतन ?
Why was salary of former Indian women hockey coach Sjoerd Marijne suspended
Why was salary of former Indian women hockey coach Sjoerd Marijne suspendedDainik Gomantak
Published on
Updated on

टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या स्टार प्रशिक्षकाचे वेतन एनओसी न मिळाल्याने रोखण्यात आले आहे. हॉकी इंडियाच्या शिफारशीनंतर माजी प्रशिक्षक मारिन यांचे संपूर्ण वेतन रोखण्यात आले कारण त्यांना देण्यात आलेला अधिकृत लॅपटॉप त्यांनी परत केला नव्हता. त्यामुळेच त्यांना 'ना हरकत पत्र' (NOC) ही देण्यात आले नाही. मात्र, नेदरलँडमधील रहिवासी असलेल्या मरिनच्या म्हणण्यानुसार, हा लॅपटॉप लवकरच भारतात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारिनचा सहा दिवसांचा पगार (जो $1,800 आहे) सध्यातरी रोखण्यात आला आहे. SAI सूत्रांनी सांगितले की हॉकी इंडियाने लॅपटॉपसंबधी रिपोर्ट दिला कारण त्यात महिला हॉकी संघाच्या सदस्यांचा सर्व डेटा होता. डेन बॉशमध्ये राहणाऱ्या मारिनने सांगितले की, ऑगस्टमध्ये लॅपटॉप तुटल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी हा वेळ घेतला आणि आता तो परत पाठवत आहे.

Why was salary of former Indian women hockey coach Sjoerd Marijne suspended
स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने फुटबॉल स्पर्धेत नोंदवला पहिला विजय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी टिम चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर आणि देय देयके मिळाल्यानंतर अधिकृत लॅपटॉप घेवून मारिन भारतीय महिला संघातून बाहेर पडला. "31 जुलै 2021 पर्यंत, त्याचे सर्व भत्ते दिले गेले आहेत आणि 1ते 6 ऑगस्ट दरम्यानचे वेतन $1800 प्रलंबित आहेत. साईच्या सूत्रांनी अधिकृत लॅपटॉप मिळताच ते पैसे देतील असे सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com