GLENN MAXWELL RUNNER: ...म्हणून वेदनेनं विव्हळणाऱ्या मॅक्सवेलला 'रनर' घेता आला नाही

RUNNER IN CRICKET: 150 च्या धावसंख्येजवळ असताना मॅक्सवेलला स्वतःच्या पायावर उभे राहणे देखील कठीण झाले होते. फिजिओने त्याला सतत मदत केल्यामुळे, अशक्य वाटणारा विजय मिळवण्याची संधी निर्माण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला त्याची क्रीजवर गरज होती.
GLENN MAXWELL RUNNER  ICC CRICKET WORLD CUP 2023
GLENN MAXWELL RUNNER ICC CRICKET WORLD CUP 2023DAINIK GOMANTAK
Published on
Updated on

Why was GLENN MAXWELL not allowed to take the 'runner', who was writhing in pain:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलने असा चमत्कार घडवला, ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.

मॅक्सवेलने 128 चेंडूत 201 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.मॅक्सवेलने 201 धावांच्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकार मारले. या महत्त्वाच्या सामन्यात मॅक्सवेलने एकहाती आपल्या संघाला विजयाकडे नेले. मॅक्सवेलची ही खेळी खूप खास होती.

वास्तविक, जेव्हा मॅक्सवेल 150 धावांच्या जवळ होता, तेव्हा त्याला पायात क्रॅम्प्स येऊ लागले. अनेकदा संघाचे फिजिओ मॅक्सवेलवर उपचार करण्यासाठी मैदानावर येताना दिसले, परंतु प्रत्येक वेळी त्याने वेदना सहन करत आपला डाव सुरू ठेवला.

जेव्हा मॅक्सवेल वेदनेने विव्हळत होता तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की त्याला 'रनर' का मिळत नाही?

मॅक्सवेलला 'रनर' का मिळाला नाही?

खरं तर, ICC कार्यकारी समितीने 2011 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये जखमी फलंदाजांसाठी 'रनर' काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

खेळाच्या वेळेत अधिक व्यत्यय येत आहेत आणि सामने वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत हे कारण देत हा निर्णय घेण्यात आला.

तेव्हा (MCC) ने आपल्या नियमांमध्ये असे म्हटले होते की, क्रिकेटचे नियम बदललेले नाहीत, परंतु हा निर्णय केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या खेळण्याच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुखापतग्रस्त फलंदाजासाठी 'रनर' दिला जाणार नाही.

जर फलंदाज गंभीर अडचणीत असेल तर त्याला पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन उपचार करावे लागतील आणि नंतर तो फलंदाज फलंदाजीला येऊ शकतो.

याचा अर्थ आता दुखापतीमुळे फलंदाज धावू शकला नाही तर त्याला दुखापत होऊन 'रिटायर्ड हर्ट' व्हावे लागेल.

दुखापतग्रस्त फलंदाजांसाठी 'रनर' असणे योग्य नाही असे वाटत असेल तर ड्रिंक्स ब्रेक आणि पर्यायी क्षेत्ररक्षकांची संकल्पना दूर करण्याचाही विचार केला पाहिजे. क्षेत्ररक्षकाला दुखापत झाल्यास किंवा क्रॅम्प्स आल्यास, त्याने आहे त्या परिस्थितीत एकतर मैदानावरच थांबावे किंवा बाहेर जावे. त्यासाठी पर्यायी क्षेत्ररक्षक देण्याची गरज नाही.
दुखापतग्रस्त फलंदाजांसाठी 'रनर' रद्द करण्यावर सुनील गावसकर यांची प्रतिक्रीया.
GLENN MAXWELL RUNNER  ICC CRICKET WORLD CUP 2023
GLENN MAXWELL चा 'बिग शो'; धुव्वादार फटाकेबाजीसह उडवला विक्रमांचा धुरळा

या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

एकावेळी ऑस्ट्रेलियन संघ हा सामना हरण्याच्या मार्गावर होता. मात्र मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी ऐतिहासिक भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 291 धावा केल्या होत्या, जे ऑस्ट्रेलियाने 3 फलंदाज राखून पूर्ण केले. या ऐतिहासिक खेळीसाठी मॅक्सवेलला सामनावीराचा किताब देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com