

GLENN MAXWELL BROKE MANY RECORDS IN ICC CRICKET WORLD CUP 2023:
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने इतिहास रचला.
ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेलेच पण अनेक विक्रमही मोडीत काढले.
मॅक्सेवलने या खेळीने आपल्या संघाला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तर पोहचवलेच पण आपल्याला 'बिग शो' का म्हटले जाते हेसुद्धा त्याने दाखवून दिले.
ग्लेन मॅक्सवेल २०१ धावांची खेळी करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकार मारले.
धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने फखर जमानला (193 धावा) मागे टाकले.
201* – ग्लेन मॅक्सवेल (AUS) विरुद्ध AFG, मुंबई, 2023 WC
193 – फखर जमान (PAK) विरुद्ध SA, जोहान्सबर्ग, 2021
185* – शेन वॉटसन (AUS) विरुद्ध BAN, मिरपूर, 2011
183* – एमएस धोनी (IND) विरुद्ध SL, जयपूर, 2005
183 – विराट कोहली (IND) विरुद्ध PAK, मीरपूर, 2012
ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय विश्वचषकात द्विशतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. मॅक्सवेलच्या आधी मार्टिन गुप्टिल (२३७*) आणि ख्रिस गेल (२१५) यांनीही अशीच कामगिरी केली होती.
237* – मार्टिन गुप्टिल (NZ) विरुद्ध WI, वेलिंग्टन, 2015
215 – ख्रिस गेल (WI) विरुद्ध , ZIM कॅनबेरा, 2015
201* – ग्लेन मॅक्सवेल (AUS) विरुद्ध AFG, मुंबई WS, 2023
188* – गॅरी कर्स्टन (SA) विरुद्ध UAE, रावळपिंडी, 1996
183 - सौरव गांगुली (IND) विरुद्ध SL, टॉंटन, 1999
याशिवाय ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला.
आता एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाकडून सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर नोंदवला गेला आहे.
ग्लेन मॅक्सवेलपूर्वी शेन वॉटसनच्या नावावर १८५ धावा करण्याचा विक्रम होता.
201* – ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध AFG, मुंबई, 2023 WC
185* – शेन वॉटसन विरुद्ध BAN, मीरपूर, 2011
181* – मॅथ्यू हेडन विरुद्ध NZ, हॅमिल्टन, 2007
179 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध PAK, अॅडलेड, 2017
178 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध AFG, पर्थ, 2015 WC
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.