Rinku Singh: रिंकूने मॅचनंतर का घेतली अभिषेक नायरची गळाभेट? कार्तिकने सांगितली पडद्यामागची कहाणी

Dinesh Karthik: रिंकू सिंग आणि अभिषेक नायर यांच्यातील खास नात्याची पडद्यामागील कहाणीचा खुलासा दिनेश कार्तिकने केला आहे.
India vs Australia | Rinku Singh Hugged Abhishek Nayar |  Dinesh Karthik
India vs Australia | Rinku Singh Hugged Abhishek Nayar | Dinesh KarthikX/DineshKarthik

Why Rinku Singh Hugged Abhishek Nayar after India vs Australia T20I match Dinesh Karthik reveals story:

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या टी20 सामन्यात 2 विकेट्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अखेरच्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांच्या सलग विकेट्स गमावल्या होत्या.

अक्षरला सीन ऍबॉटने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले, तर बिश्नोई आणि अर्शदीप धावबाद झाले. त्यामुळे भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज होती. यावेळी ऍबॉटने नो-बॉल टाकला. त्यामुळे भारताचा विजय तिथेच निश्चित झाला.

पण असे असले तरी या नो-बॉलवर रिंकू सिंगने षटकारही खेचला होता. त्यामुळे जरी तो चेंडू अधिकृत असता, तरी भारताचा विजय रिंकू सिंगने निश्चित केला होता. तो अखेरीत १४ चेंडूत २२ धावा करून नाबाद राहिला होता.

दरम्यान, या सामन्यानंतर रिंकूने माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक अभिषेक नायरला जाऊन मिठी मारली. मात्र, यामागील कारण अनेकांना माहित नव्हते. अखेर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने ट्वीट करत यामागील कहाणी सर्वांसमोर मांडली आहे.

India vs Australia | Rinku Singh Hugged Abhishek Nayar |  Dinesh Karthik
IND vs AUS: सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने T20 मध्ये रचला नवा विश्वविक्रम; द. आफ्रिकेला पछाडलं

कार्तिकने सांगितली पडद्यामागील कहाणी

कार्तिकने सांगितले की नायर आणि रिंकू यांच्यातील भागीदारी 2018 मध्ये सुरू झाली होती, त्यावेळी कार्तिकही केकेआर संघाचा भाग होता.

कार्तिकने सांगितले, 'नायरने नेहमीच रिंकूमध्ये प्रतिभा पाहिली होती. तो मला सांगायचा की तो काहीतरी स्पेशल करण्याआधी हे फक्त वेळेचे गणित आहे. अलिगढ सारख्या छोट्याशा शहरातून आलेल्या रिंकूला मोठा विचार करण्याची गरज आहे. मला वाटते की कदाचीत नायरने रिंकूबरोबर जेव्हा त्याच्या डेथ ओव्हर्समधील क्षमतेवर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याच्या मानसिकतेत मोठा बदल झाला.'

कार्तिकने पुढे लिहिले, आज जेव्हा मी तो फोटो पाहिला, तेव्हा मला वाटले की नायरचा प्रशिक्षक म्हणून स्थर उचांवला आहे आणि त्याला जे रिंकूबद्दल वाटले, तो आनंद जगासमोर मांडला पाहिजे. जेव्हा तुमचा विद्यार्थी जागतिक स्थरावर चांगली कामगिरी करतो, ते पाहाणे आणि त्यातही जर तुम्ही ब्रॉडकास्टर म्हणून तो क्षण लाईव्ह पाहात असाल, तर नक्कीच ती अविश्वसनीय भावना असेल.'

India vs Australia | Rinku Singh Hugged Abhishek Nayar |  Dinesh Karthik
IND vs AUS: रिंकूने शेवटच्या बॉलवर सिक्स मारूनही मिळाल्या नाहीत सहा धावा, पण का? घ्या जाणून

नायरने रिंकूला केकेआरमध्ये घेण्यासाठी कसे मनवले हे देखील कार्तिकने सांगितले. त्याने लिहिले 'जेव्हा रिंकूला एसीएलची दुखापत होती, तेव्हा देखील नायरने वेंकी म्हैसूर सरांना (केकेआर सीईओ) मनवले होते आणि त्यांनीही रिंकूला संघाचा भाग बनवले होते, तसेच त्याला केकेआरबरोबर प्रवासही करू दिला होता.

'आयपीएलनंतरही रिंकू नायरच्या घरी रिहॅबसाठी बरेच महिने राहिला आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या फलंदाजीवर काम करणे सुरू केले. त्यानंतर रिंकूसाठी देशांतर्गत हंगामही शानदार राहिला आणि अखेर नायर आणि केकेआरने जो त्याच्याबद्दल विचार केलेला, तो त्याने पूर्ण करून दाखवला.'

सांगण्यासारखी गोष्ट अशी की दिनेश कार्तिकने देखील नायककडून काही काळ प्रशिक्षण घेतले होते. भारतीय संघात जेव्हा कार्तिकने पुनरागमन केले, त्यात नायरचेही योगदान महत्त्वाचे ठरले होते.

नायरची कारकिर्द

हैदराबादमध्ये जन्मलेला नायरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील बराच काळ मुंबईसाठी क्रिकेट खेळले. त्याने 103 प्रथम श्रेणी सामने, 99 लिस्ट ए सामने आणि 95 टी20 सामने खेळले.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 शतके आणि 32 अर्धशतकांसह 5749 धावा केल्या आणि 173 विकेट्स घेतल्या. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये नायरने 2145 धावा केल्या, तर 79 विकेट्स घेतल्या. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 1291 धावा केल्या आणि 27 विकेट्स घेतल्या.

याशिवाय नायर भारताकडून 3 वनडे सामनेही खेळला. मात्र त्याला एकाच डावात फलंदाजीची संधी मिळाली, मात्र त्यातही तो शुन्यावर नाबाद राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com