IPL 2024 Auction: स्टार्क-कमिन्सला का मिळाले 20 कोटींपेक्षा जास्त किंमत? ही आहेत 3 महत्त्वाची कारणे

Mitchell Starc-Pat Cummins: आयपीएल 2024 लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे.
Pat Cummins and Mitchell Starc
Pat Cummins and Mitchell StarcICC

IPL 2024 Players Auction, Mitchell Starc and Pat Cummins:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या लिलावाने इतिहास रचला आहे. या हंगामाचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठ्या रकमेच्या बोली लागल्या.

त्यातही मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांच्या जोडगोळीसाठी मिळून तब्बल 45 कोटींपेक्षा अधिकची रक्कम खर्च करण्यात आली.

स्टार्क आणि कमिन्स आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले. स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. तसेच कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजले.

दरम्यान, पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळाडूंना 20 कोटींहून अधिक रुपये मिळणार आहेत. पण स्टार्क आणि कमिन्स यांना इतकी मोठी बोली लागण्यामागे काय कारण असू शकते, याचा घेतलेला हा आढावा.

अनुभव

स्टार्क आणि कमिन्स हे दोघेही ऑस्ट्रेलियाचे अनुभवी खेळाडू आहेत. गेल्या 12 वर्षांपासून हे दोघेही ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहेत. तसेच तिन्ही क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलिया संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव देखील आहे.

स्टार्कने आंतरराष्ट्रीय स्तरावर 250 पेक्षा अधिक सामन्यांत 600 हुन अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कमिन्सने 180 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 430 हून विकेट्स घेतल्या आहेत.

स्टार्कने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 121 टी20 सामने खेळले असून 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर कमिन्सने 128 टी20 सामने खेळले असून 143 विकेट्स घेतल्या आहेत.

Pat Cummins and Mitchell Starc
IPL 2024 Auction: ट्रेविस हेड 'या' संघात सामील, तर ब्रुकला तब्बल 9.25 कोटींचा तोटा

मोठ्या सामन्यांचे खेळाडू आणि नेतृत्वाची क्षमता

स्टार्क आणि कमिन्स यांना मोठ्या सामन्यांचे खेळाडू म्हणूनही ओळखले जाते. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नेहमीच त्यांची कामगिरी उंचावलेली दिसली आहे. दरम्यान, त्यांनी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून दोन वनडे वर्ल्डकप, एक टी20 वर्ल्डकप आणि कसोटी चॅम्पियनशीपही जिंकली आहे.

याशिवाय नुकत्याच भारतात झालेल्या 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही हे दोघे खेळले होते आणि ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देण्यासाठीही अंतिम सामन्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले होते. याशिवाय दोघांकडेही नेतृत्वाची क्षमता आहे.

विशेष म्हणजे कमिन्सच्या नेतृत्वाची झलक यावर्षी सर्वांनाच पाहायला मिळाली आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली यावर्षी ऑस्ट्रेलियाने ऍशेस, कसोटी चॅम्पियनशीप आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धा जिंकली आहे. 

Pat Cummins and Mitchell Starc
IPL 2024 Auction: अष्टपैलूंनी लुटली मैफील! कमिन्सला 20 कोटी, तर 'या' खेळाडूंवर करोडोंचा वर्षाव

फलंदाजीही क्षमता

स्टार्क आणि कमिन्स ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज असले, तरी त्यांच्याकडे खालच्या फळीत फलंदाजीला येत संघाच्या धावसंख्येत भर घालण्याची क्षमता आहे. त्यांनी अनेकदा महत्त्वाच्या खेळीही केल्या आहेत.

स्टार्कने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2500 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कमिन्सनेही 1500 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे असलेली फलंजदाजीची क्षमताही त्यांचे महत्त्व वाढवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com