Shardul Thakur | Pat Cummins | Rachin Ravindra
Shardul Thakur | Pat Cummins | Rachin RavindraX

IPL 2024 Auction: अष्टपैलूंनी लुटली मैफील! कमिन्सला 20 कोटी, तर 'या' खेळाडूंवर करोडोंचा वर्षाव

IPL 2024 Auction all-rounders: आयपीएल 2024 लिलावात अष्टपैलू खेळाडूंना फ्रँचायझींकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याचे दिसले.
Published on

IPL 2024 Auction All-rounders:

दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) लिलाव होत आहे. या लिलावासाठी तब्बल 333 खेळाडूंची निवड झाली होती. यातील अनेक अष्टपैलू खेळाडूंना फ्रँचायझींकडून पसंती मिळाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अष्टपैलू खेळाडूंचा सेट या लिलावात दुसऱ्या सत्रात होता. या सत्रात जवळपास सर्वच संघ व्यस्त होते.

दरम्यान, याच सत्रात आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडी बोली लागली. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिन्सने या लिलावात इतिहास रचला. अष्टपैलू कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Shardul Thakur | Pat Cummins | Rachin Ravindra
धोनी-जड्डूची दोस्ती ते गिलची शतकं; IPL 2023 मधील 7 अविस्मरणीय क्षण

तसेच त्याच्याशिवाय न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिचेलला चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केले. तसेच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हर्षल पटेललाही मोठी रक्कम लिलावात मिळाली. त्याला पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपयांमध्ये त्याला संघात सामील करून घेतले.

दरम्यान, दुपारी 3 वाजेपर्यंत कमिन्स, मिचेल आणि हर्षल या तीन अष्टपैलूंनाच 10 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. त्यामुळे दुपारपर्यंत तरी हे तिघेच या लिलावातील सर्वात महागडे खेळाडू होते.

दरम्यान, यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा प्रतिभावान अष्टपैलू गेराल्ड कोएत्झीला 5 कोटींमध्ये मुंबई इंडियन्सने संघात सामील करून घेतले. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सला 4.20 कोटी रुपयांना पंजाब किंग्सने संघात घेतले. त्याचबरोबर श्रीलंकाचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबादने 1.50 कोटीला खरेदी केले.

Shardul Thakur | Pat Cummins | Rachin Ravindra
IPL ला मिळणार चौथा लिलावकर्ता! कोण सांभाळणार जबाबदारी, जाणून घ्या

या लिलावाआधी सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या खेळाडूंमधील रचिन रविंद्र आणि शार्दुल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्सने संघात घेतले आहे. यामुळे शार्दुलची चेन्नई संघात घरवापसीही झाली आहे. रचिनला 1.8 कोटी रुपयांमध्ये, तर शार्दुलला 4 कोटी रुपयांमध्ये चेन्नईने संघात घेतले.

आंतरराष्ट्रीय अष्टपैलूंपैकी अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह उमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाखाला खरेदी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com