बांगलादेशच्या आजी-माजी कर्णधारामधील वाद चव्हाट्यावर, हिटमॅनचं उदाहरण देत शाकिब म्हणाला...

Tamim Iqbal Shakib Al Hasan: आयसीसी विश्वचषक 2023 साठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला तेव्हा माजी कर्णधार तमीम इक्बालचे नाव त्यात नव्हते.
Tamim Iqbal Shakib Al Hasan
Tamim Iqbal Shakib Al HasanDainik Gomantak
Published on
Updated on

Tamim Iqbal Shakib Al Hasan: आयसीसी विश्वचषक 2023 साठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला तेव्हा माजी कर्णधार तमीम इक्बालचे नाव त्यात नव्हते.

तमीम इक्बाल आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यात काही काळापासून तेढ निर्माण झाली होती आणि या सगळ्या दरम्यान त्याने कर्णधारपदही सोडले होते. यातच आता, बांगलादेशचा कर्णधार शाबिक अल हसनने तमीम इक्बालबद्दल खुलेपणाने आपले मत व्यक्त केले आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघात तमिम इक्बालला का स्थान देण्यात आले नाही हे त्याने स्पष्ट केले. यादरम्यान शाकिबने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे उदाहरणही दिले.

शाकिब म्हणाला की, जेव्हा आम्ही संघात असतो तेव्हा आमच्यासाठी वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा असायला हवा. तुम्ही शतक केले आणि तरीही संघ हरला तर तुमच्या शतकाला काही अर्थ नाही, असेही तो पुढे म्हणाला.

टी-स्पोर्ट्सशी बोलताना शाकिब म्हणाला, 'रोहित शर्मासारखा (Rohit Sharma) खेळाडू, ज्याने सातव्या क्रमांकापासून सलामीवीरापर्यंत आपली कारकीर्द घडवली. 10,000 पेक्षा जास्त धावा करुन, तो कधी नंबर-3 किंवा नंबर-4 वर फलंदाजीला आला तर त्यात काही मोठी अडचण आहे का?

ही खूप बालिश गोष्ट आहे, ही माझी बॅट आहे, मी फलंदाजी करेन, या बॅटने दुसरे कोणी खेळू शकत नाही, असे म्हणण्यासारखे आहे.'

Tamim Iqbal Shakib Al Hasan
Shakib Al Hasan Video: बांगलादेशी कॅप्टन शाकिबला फॅन्सकडून धक्का-बुक्की, कॉलरही खेचली अन्...

शाकिब पुढे म्हणाला की, 'फलंदाजाने संघाच्या गरजेनुसार कोणत्याही फलंदाजीच्या स्थितीत फलंदाजीसाठी तयार असले पाहिजे. संघ प्रथम येतो, तुम्ही शतक किंवा द्विशतक केले तरी फरक पडत नाही आणि संघ हरतो.

तेव्हा तुमच्या वैयक्तिक कामगिरीचे तुम्ही काय कराल?' याशिवाय तमिमला संघात न घेण्याचा निर्णय पूर्णपणे बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्डाचा असल्याचेही शाकीबने स्पष्टपणे सांगितले.

Tamim Iqbal Shakib Al Hasan
IPL 2023 चा हंगाम Shakib Al Hasan खेळणार नाही, जाणून घ्या कारण

विश्वचषक 2023 साठी बांगलादेश संघ

नजमुल शांतो, तन्झीद हसन, तौहीद हृदया, तन्झिम शाकिब, नसुम अहमद, शॉरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com