Asia Cup Final: आशिया चषकावर कोण बाजी मारणार? पाकिस्तान-श्रीलंका पुन्हा आमने-सामने

मागील विजयामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे.
Asia Cup Final: आशिया चषकावर कोण बाजी मारणार? पाकिस्तान-श्रीलंका पुन्हा आमने-सामने
Published on
Updated on

आशिया चषकाचा (Asia Cup 2022) अंतिम सामना आज पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan Srilanka यांच्यात होणार आहे. सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला पराजित केले. त्यानंतर आज होणारा आशिया चषकाचा अंतिम सामना अतिशय रंजक होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने चषकावर कुणाची मोहोर उमटणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे, सायंकाळी 7.30 वाजता ही लढत सुरु होईल. मागील विजयामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. पाकिस्तान देखील सामन्यात सुरूवातीपासून वर्चेस्व प्रास्तापित करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Asia Cup Final: आशिया चषकावर कोण बाजी मारणार? पाकिस्तान-श्रीलंका पुन्हा आमने-सामने
राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरची चेन्नई ते बंगळुरू विमानसेवा सुरू

पाकिस्तानचा संभाव्य संघ

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, हरिस रौफ

श्रीलंकेचा संभाव्य संघ

कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), दासून शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, चरिथ असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, मथिशा पाथिराना, दिलशान मधुशंका, जेफ्री वँडरसे, माहीश तिक्षाणा

Asia Cup Final: आशिया चषकावर कोण बाजी मारणार? पाकिस्तान-श्रीलंका पुन्हा आमने-सामने
NIT Goa: आयआयटीसह राष्ट्रीय संस्था प्रवेशाकरता एनआयटी करणार मोफत मार्गदर्शन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com