गोव्यातील अधिकाधिक विद्यार्थी आयआयटी, एनआयटी आणि इतर प्रतिष्ठित राष्ट्रीय तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रवेश परिक्षा यशस्वीपणे पूर्ण करणे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आव्हान असते. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सक्रियता दाखवली आहे.
(NIT Goa will conduct free guidance for entrance exams in national institutes including IITs)
विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) सोमवारपासून विशेष सत्र सुरू करणार आहे. या विशेष सत्रात गोव्यातील विद्यार्थ्यांना मोफत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना एनआयटी गोवाचे संचालक गोपाल मुगेराय हे फर्मागुडी येथील कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतील.
मुगेराय म्हणाले की, “गोव्यातील अनेक विद्यार्थी जेईई उत्तीर्ण करतात परंतु ऑनलाइन प्रवेश परिक्षा पूर्ण करताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष यामुळे वाया गेले. असे नुकसान होऊ नये यासाठी, आम्ही हे विनामूल्य सत्र सुरू करत आहोत. यावर्षी, बीटेक प्रवेश प्रक्रिया 12 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 9 नोव्हेंबरला संपेल असे ही ते म्हणाले.
एनआयटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शिबपूर (IIEST), आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) आणि काही इतर तांत्रिक संस्थांना केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे पूर्ण किंवा अंशतः निधी दिला जातो. शैक्षणिक संस्था ऑफर करतात त्यासाठी प्रवेश JEE (मुख्य) 2022 च्या आधारावर आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) अनेक शैक्षणिक कार्यक्रम ऑफर करतात यासाठी प्रवेश JEE (Advanced) 2022 च्या आधारावर प्रवेश आहे. त्यामूळे या प्रवेश परिक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास ते आपले ध्येय गाठू शकतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.