CWG 2022: भारतावर झालेल्या अन्यायाला जबाबदार कोण? अंतिम फेरी गाठण्याचे भंगले स्वप्न

Indian Women's Hockey Teams: सामना अधिकाऱ्यांकडून ही चूक झाली.
Indian Women's Hockey Teams
Indian Women's Hockey TeamsDainik Gomantak
Published on
Updated on

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे शुक्रवारी रात्री भारतीय महिला हॉकी संघाची निराशा झाली. 60 मिनिटे या जगज्जेत्या संघाला टक्कर देत भारताने स्कोअरलाइन 1-1 अशी ठेवली. निर्धारित वेळ संपल्यानंतर सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला. शूटआऊटदरम्यान अशी एक चूक झाली, ज्यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य खचले. परंतु ही चूक भारतीय खेळाडूंनी केली ना ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी. ही चूक सामना अधिकाऱ्यांकडून झाली, ज्याचा फटका भारताला सहन करावा लागला. काय होते हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया-

60 मिनिटे स्कोअरलाइन 1-1अशी होती

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. हा सामना जिंकणाऱ्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला असता आणि किमान संघाचे रौप्य पदक निश्चित झाले असते. 10व्या मिनिटालाच रेबेका ग्रेनरच्या गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर (India) दडपण आणण्यास सुरुवात केली. परंतु पहिला गोल झाल्यानंतर भारतीय बचावफळीने ऑस्ट्रेलियाला संधीच दिली नाही. ऑस्ट्रेलिया (Australia) सातत्याने भारताच्या गोलपोस्टवर मारा करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यात त्यांना यश मिळत नव्हते. त्यानंतर 49 व्या मिनिटाला वंदना कटारियाने सुशीलाकडे पास करत भारताला सामन्यात पुनरागमन मिळवून दिले. 60 मिनिटे स्कोअरलाइन 1-1 राहिल्यानंतर सामना शूटआउटमध्ये गेला.

Indian Women's Hockey Teams
Commonwealth Games: सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानी वेटलिफ्टर्सचे मीराबाईने केले अभिनंदन

शूटआउट दरम्यान गोंधळ

शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिली संधी मिळाली आणि अ‍ॅम्ब्रोसिया मेलोन स्ट्रोक घेण्यासाठी आली. भारतीय कर्णधार सविताने बचावात्मक पवित्रा घेतला. यामध्ये ऑस्ट्रेलियाची निराशा झाली. परंतु इथेच सामन्यात ट्विस्ट आला, सामना अधिकारी घड्याळ चालू करायला विसरले, त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूचा शॉट अवैध मानला गेला. मॅलोनला पुन्हा स्ट्रोक घेण्यास सांगण्यात आले. या गोलमुळे भारतावर दबाव निर्माण झाला आणि टीम इंडियाला 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. सामना अधिकाऱ्यांकडून ही चूक झाली नसती तर भारतावर दडपण आले नसते आणि कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

Indian Women's Hockey Teams
Commonwealth Games 2022:बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्सची शानदार सुरूवात, पीव्ही सिंधूने केले भारतीय संघाचे नेतृत्व

टोकियो ऑलिम्पिकमध्येही अशीच घटना भारतासोबत घडली होती

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुष संघाने 41 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सामना जिंकला. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला. या सामन्याच्या शेवटीही टायमरवरुन वाद झाला. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये वेळ थांबली होती आणि जर्मनीला पेनल्टी कॉर्नरसाठी 6 सेकंद मिळाले. मात्र, तिथे श्रीजेशने गोल वाचवला. परंतु मोठ्या सामन्यांमध्ये सामना अधिकाऱ्यांच्या या चुकांचा फटका संघाला बसणे योग्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com