Commonwealth Games: सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानी वेटलिफ्टर्सचे मीराबाईने केले अभिनंदन

Mohammad Noah Dastgir Butt: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
Mirabai Chanu
Mirabai ChanuDainik Gomantak
Published on
Updated on

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. मोहम्मद नोह दस्तगीर बट्टने वेटलिफ्टिंगमध्ये पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिले. यातच ऑलिम्पिक पदक विजेत्या मिराबाई चानूने मोहम्मद बट्टचे अभिनंदन केले आहे. भारतातच नाही तर शेजारील देशातही वेटलिफ्टर्ससाठी एक आदर्श आहे, असे मीराबाईने म्हटले. मीराबाई चानूनेही या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या 109 किलो वजनी गटात 405 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकणारा मोहम्मद नोह दस्तगीर बट्ट (Mohammad Noah Dastgir Butt) म्हणाला, "माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताची सुपरस्टार असणाऱ्या मीराबाई चानूने (Mirabai Chanu) देखील माझे अभिनंदन केले. माझ्या कामगिरीचे कौतुक केले. " 24 वर्षीय या जिगरबाज वेटलिफ्टर्सने तिन्ही सामन्यांमध्ये विक्रम मोडीत काढले. त्याने स्नॅचमध्ये 173, क्लीन अँड जर्कमध्ये 232 आणि एकूण 405 किलो वजन उचलले.

Mirabai Chanu
Commonwealth Games 2022: टेबल टेनिसमध्ये भारताने मिळवले आणखी एक सुवर्णपदक

दुसरीकडे, माझ्यासाठी हा सामना भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) असा नव्हताच. मला फक्त यामध्ये माझा बेस्ट द्यायचा होता, असेही बट म्हणाला. तो पुढे म्हणाला, "मी भारताच्या कोणत्यातरी लिफ्टरशी स्पर्धा करत होतो असे मला वाटत नव्हते. मला फक्त माझा बेस्ट द्यायचा होता. पाकिस्तानसाठी पदक जिंकायचे होते." मोहम्मद नोहा दस्तगीर बट दोनदा भारतात आला आहे. भारत दौऱ्याच्या आठवणी माझ्या कायम मनात राहतील. 2015 आणि 2016 मध्ये स्पर्धेसाठी तो भारतात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com