T20 World Cup: क्लोज मॅचमध्ये बांगलादेशचा 5 धावांनी पराभव, भारतीय संघाने गाठली उपांत्य फेरी

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना अ‍ॅडलेडमध्ये खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकांत 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने नाबाद 64 धावा केल्या. तर 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 7 षटकांत 66 धावा केल्या होत्या. परंतु पावसानंतर सामन्यात बांग्लादेशने शानदार फटकेबाजी केली. मात्र भारताने बांग्लादेशवर शानदार विजय मिळवला.

टीम इंडिया पुढे बांगलादेशने गुडघे टेकले

अ‍ॅडलेड ओव्हलवर विराट कोहलीची (Virat Kohli) धमाकेदार कामगिरी अबाधित राहिली. त्याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात 6 बाद 184 धावा केल्या. कोहलीने 44 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याच्या शानदार फटकेबाजीला बांगलादेशच्या (Bangladesh) एकाही गोलंदाजाकडे उत्तर नव्हते. येथील खेळपट्टी पर्थपेक्षा संथ होती, त्यावर पॉवरप्लेनंतर बांगलादेशचे गोलंदाज दडपणाखाली आले. केएल राहुल 31 चेंडूत 50 धावा करुन फॉर्ममध्ये परतला.

Team India
T20 World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास, हा 'महा रेकॉर्ड' केला आपल्या नावावर

कोहलीने राहुलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली

कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी राहुलसोबत 67 आणि तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) 38 धावांची भागीदारी केली. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या यादवने 15 चेंडूत 30 धावा केल्या. तस्किन अहमदच्या चेंडूवर पहिल्याच षटकात भारतीय कर्णधार रोहित शर्माला जीवदान मिळाले, पण त्याचा फायदा उठवता आला नाही आणि सात चेंडूंत दोन धावा करुन तो बाद झाला. शाकिबने चार षटकात 33 धावा देत राहुल आणि सूर्याच्या विकेट घेतल्या, पण तस्किन बांगलादेशचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला.

Team India
T20 World Cup: पंत की कार्तिक! बांगलादेशविरुद्ध कोण खेळणार? द्रविडने हे दिले उत्तर

शरीफुल इस्लाम आणि हसन महमूद यांची खराब गोलंदाजी

डावखुरा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि हसन महमूद यांना अनुक्रमे 57 आणि 47 धावा दिल्या. इस्लामला एकही विकेट मिळवता आली नाही, तर महमूदने तीन बळी घेतले. गेल्या तीन सामन्यांपासून खराब फॉर्ममुळे टीका होत असलेल्या राहुलने चांगली फलंदाजी केली. पहिल्या 21 धावा करण्यासाठी त्याने 20 चेंडू खेळले, परंतु पॉवरप्लेनंतर त्याने दोन शानदार षटकार मारले.

Team India
T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल करण्याची मागणी; हरभजन सिंग म्हणाला...

राहुल 31 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला

राहुलच्या पुढच्या 29 धावा दहा चेंडूत आल्या. तो 31 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. मुस्तफिझूर रहमानने त्याला शाकिबच्या चेंडूवर झेलबाद केले. दुसऱ्या विकेटच्या भागीदारीत 35 चेंडूत 67 धावा झाल्या. दुसऱ्या टोकाला कोहलीने तस्किनला दोन आणि मुस्तफिझूरला एक चौकार मारला. सूर्याने छोटी पण आक्रमक खेळी खेळली, पण शाकिबच्या चेंडूवर विकेट गमावली. दुसऱ्या टोकाला हार्दिक पंड्या (5), दिनेश कार्तिक (7) आणि अक्षर पटेल (7) यांनाही साथ देता आली नाही. रविचंद्रन अश्विनने सहा चेंडूंत नाबाद 13 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com