भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने याआधी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. पहिल्या T20 सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) माध्यमांशी संवाद साधला. (When Asked About Virat Kohli's Poor Form Rohit Sharma Got Angry With The Media)
दरम्यान, विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मवर प्रश्न विचारला असता रोहित मीडियावर भडकला म्हणाला, 'तुम्ही शांत राहाल तर सर्व काही ठीक होईल. विराट गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांत तो 8, 18 आणि 0 धावा करु शकला.'
रोहित पुढे म्हणाला, 'तुम्ही लोक त्याला काही काळ एकटं सोडा. विराट एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. कोणी इतके दिवस क्रिकेट खेळत असेल तर त्याच्यावर दबाव येतोच. बाकी सर्व काही माध्यमांवर अवलंबून असते. त्याला थोडा वेळ द्या, तो ठीक होईल.'
रोहित टीम कॉम्बिनेशनवरही बोलतो
पत्रकार परिषदेत विराटसोबतच रोहितने टी-20 साठी टीम कॉम्बिनेशनबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला, मी टी-20 सामन्यांमध्ये कोणताही प्रयोग करण्याच्या बाजूने नाही. आणि करणारही नाही. 'प्रयोग' हा शब्द अगदी ओव्हर-रेट केलेला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील.
'येत्या काळात सर्व खेळाडूंना संधी मिळेल'
टीम इंडियामध्ये (Team India) उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना संधी दिली जाईल का, असे विचारले असता? रोहित म्हणाला, आमची योजना सर्व खेळाडूंची टेस्ट घेण्याची आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आम्हाला संधी द्यायची आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. विश्वचषकापर्यंत कोण तंदुरुस्त असेल हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल.
'फिट खेळाडूंना तयार राहावे लागेल'
रोहित पुढे म्हणाला, येत्या काही महिन्यांत आम्हाला बरेच सामने खेळायचे असून व्यस्त वेळापत्रक आहे. यातच काही खेळाडू दुखापतग्रस्तही होत आहेत. म्हणूनच जे खेळाडू तंदुरुस्त असतील त्यांना संधी दिली जाईल. या मालिकेत आणि आगामी मालिकेत आम्हाला आमच्या बेंच स्ट्रेंथचा पुरेपूर वापर करायचा आहे.
'हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण'
हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) प्रश्न विचारला असता रोहित म्हणाला, 'हार्दिक आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो टीम इंडियाला तीन्ही फॉरमॅटमध्ये मदत करु शकतो. तो फक्त फलंदाज म्हणून खेळेल की नाही याबद्दल मी आतापर्यंत संघ व्यवस्थापनाशी बोललो नाही. आमचे सर्व खेळाडू विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त आणि निवडीसाठी उपलब्ध असावेत अशी आमची इच्छा आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या टप्प्यावर विचार करु, कोणाला संघात ठेवायचे आणि कोणाला नाही.'
'टी-20 विश्वचषकासाठी योग्य प्लेइंग-11 निवडावा लागेल'
रोहित पुढे म्हणाला, 'सध्या सर्व खेळाडूंसाठी दरवाजे खुले आहेत. आम्हाला विश्वचषकापूर्वी योग्य प्लेइंग-11 तयार करायचा आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे.'
वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.