IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, वॉशिंग्टन सुंदर T20 मालिकेतून आऊट

भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील 16 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 16 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वीच टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. वृत्तानुसार, सुंदरला मालिकेआधीच दुखापत झाली असून यापुढे तो या मालिकेचा भाग असणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरची रवानगी थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केली जाईल, जिथे त्याच्यावर उपचार केले जातील. सुंदरने नुकतेच एकदिवसीय मालिकेतूनच संघात पुनरागमन केले होते. (Washington will miss the T20 series between beautiful India and the West Indies due to injury)

Team India
BCCI उभारणार नॅशनल क्रिकेट अकादमी

पीटीआयने बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुंदरला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे, त्यामुळे तो या मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. अधिकाऱ्याने पुढे सांगितले, “वॉशिंग्टनच्या स्नायूंवर ताण आला असल्याने तो आज (Monday 14 February) सरावही करु शकला नाही. 5 दिवसांत 3 सामने खेळवण्यात येणार असल्याने तो संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

हे दोन खेळाडू आधीच बाहेर

अलीकडेच, BCCI ने घोषित केले होते की, उपकर्णधार KL राहुल आणि स्टार अष्टपैलू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. रोहित शर्मासाठी हा मोठा धक्का होता.

Team India
Arjun Tendulkar IPL 2022 Auction: अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा मुंबईकडेच !

या दोन खेळाडूंची संघात एंट्री

अक्षर पटेल आणि केएल राहुलला (KL Rahul) वगळल्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. मात्र त्यांच्या जागी बीसीसीआयने आणखी दोन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. निवडकर्त्यांनी राहुल आणि अक्षर यांच्याऐवजी दीपक हुडा (Deepak Hooda) आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश केला आहे. गायकवाडला राहुलच्या अनुपस्थितीत त्याचे स्थान पक्के करण्याची ही उत्तम संधी असणार आहे. दुसरीकडे, दीपक हुड्डाला वनडे मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीचे फळ मिळाले.

वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com