Sanju Samson: सॅमसनचा 'सुपर' कॅच! हवेत उडी मारत तोडफोड फलंदाजी करणाऱ्या मेयर्सला धाडलं माघारी..., पाहा Video

WI vs IND, 4th T20I: संजू सॅमसनने वेस्ट इंडिजचा सलामीवीर मेयर्सचा हवेत उडी मारत शानदार झेल घेतला.
Sanju Samson
Sanju SamsonDainik Gomantak
Published on
Updated on

Sanju Samson Brilliant Catch of Kyle Mayers: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात टी20 मालिका सुरू असून चौथा सामना फ्लोरिडाला खेळवण्यात आला. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक करणाऱ्या संजू सॅमसनने एक शानदार झेल घेत सर्वांची वाहवा मिळवली.

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजकडून काईल मेयर्स आणि ब्रेंडन किंग यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच षटकात मेयर्सने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने या षटकात एक षटकार एक चौकार मारला.

Sanju Samson
Sanju Samson: सूर्यानं दाखवलं सॅमसनसाठी मोठं मन? चाहत्यांमध्ये 9 क्रमांकाच्या जर्सीने चर्चेला उधाण

दुसऱ्या षटकातही मेयरने चौकार मारला होता. त्यामुळे तो आता अशीच फटकेबाजी करतो की काय असे अनेक चाहत्यांना वाटले होते. मात्र, त्याला आर्शदीप सिंगने गोलंदाजी केलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विकेट गमवावी लागली. त्याचा झेल सॅमसनने घेतला.

मेयर्सने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने बॅटची कड घेतली आणि वर उडाला. त्यामुळे सॅमसनने उंच उडी मारत हा झेल घेतला. त्यामुळे मेयर्स 1 षटकार आणि 2 चौकारांसह 7 चेंडूत 17 धावा करून माघारी परतला.

Sanju Samson
Sanju Samson: 'भारतीय क्रिकेटर होणं सोप्पं नाही...', सॅमसन 8-9 वर्षांच्या संघर्षाबद्दल स्पष्टच बोलला

दरम्यान, नंतर आर्शदीपने ब्रेंडन किंगलाही (18) माघारी धाडले. 7व्या षटकात निकोलस पूरन (1) आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल (1) यांना कुलदीप यादवने बाद करत वेस्ट इंडिजला मोठे धक्के दिले. नंतर शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी डाव सावरत वेस्ट इंडिजला 100 टप्पा पार करून दिला.

होप 29 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्यानंतरही वेस्ट इंडिजने रोमरियो शेफर्ड (9) आणि जेसन होल्डर (3) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण हेटमायरने त्याची लय कायम ठेवताना अर्धशतक पूर्ण केले. तो अखेरच्या षटकात 61 धावांवर बाद झाला. अखेर वेस्ट इंडिजला 20 षटकात 8 बाद 178 धावा करता आल्या.

भारताकडून आर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल, मुकेश कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com