Sanju Samson: 'भारतीय क्रिकेटर होणं सोप्पं नाही...', सॅमसन 8-9 वर्षांच्या संघर्षाबद्दल स्पष्टच बोलला

India vs West Indies 3rd ODI : विंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनने भारतीय क्रिकेटपटू होणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
Sanju Samson
Sanju SamsonDainik Gomantak
Published on
Updated on

Sanju Samson Spoke About Challenges of Being Indian Cricketer: भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असतात. पण अनेकदा संघात जागा मिळाली, तरी ती पक्की करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संजू सॅमसनही असाच एक खेळाडू असून तोही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने भारतीय संघात आत-बाहेर करत आहे. याबद्दल आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

सॅमसनने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तरी त्याला गेल्या ८-९ वर्षापासून संघर्ष करावा लागला आहे. याबद्दल वेस्ट इंडिजविरुद्ध मंगळवारी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर सॅमसनने प्रतिक्रिया दिली.

Sanju Samson
Sanju Samson Meet Rajinikanth: 'तब्बल 21 वर्षांनंतर तो दिवस आलाच...' संजू सॅमसनचा थलायवाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

सॅमसन म्हणाला, 'भारतीय क्रिकेटपटू होणे आव्हानात्मक आहे. मी गेल्या 8-9 वर्षात देशांतर्गत आणि भारतासाठी मायदेशात आणि परदेशात क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या क्रमांकावर खेळण्याची समज मिळते. तुम्हाला किती षटके फलंदाजीसाठी मिळणार आहेत, हे तुम्ही किती क्रमांकावर फलंदाजी करता, यापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण तशी तुम्हाला तयारी करायची असते.'

सॅमसनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली होती. पण त्याला दुसऱ्या सामन्यात खास काही करता आले नाही. तो 19 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. पण तिसऱ्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 4 षटकार मारले.

Sanju Samson
Sanju Samson: सूर्यानं दाखवलं सॅमसनसाठी मोठं मन? चाहत्यांमध्ये 9 क्रमांकाच्या जर्सीने चर्चेला उधाण

तिसऱ्या सामन्यातील खेळीबद्दल तो म्हणाला, 'खेळपट्टीवर काही वेळ घालवणे नक्कीच चांगले आहे. तुमच्या देशासाठी काही धावा काढणे आणि योगदान देण्याने आनंद मिळतो. माझ्याकडे वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या योजना होत्या. मला माझ्या पायांचा वापर करून गोलंदाजांच्या लेंथवर वर्चस्व ठेवायचे होते.'

दरम्यान, तिसऱ्या वनडेबद्दल सांगायचे झाल्यास, सॅमसन व्यतिरिक्त शुभमन गिल (85), इशान किशन (77) आणि हार्दिक पंड्या (70*) यांनीही अर्धशतके केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या होत्या.

त्यानंतर भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 35.3 षटकात 151 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com