National Archery Tournament: पश्चिम बंगालची विजयी दौड कायम

भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पार्थला चंडीगडच्या दिव्यांशने झुंजवले
National Archery Tournament
National Archery TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्राचा पार्थ साळुंखे आणि चंडीगडची गुंचा अश्री यांनी 42 व्या राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह राऊंड प्रकारात अनुक्रमे मुला व मुलींत वैयक्तिक विजेतेपद मिळविले. या प्रकारातील मिश्र सांघिक गटात पश्चिम बंगाल संघ विजेता ठरला. स्पर्धा कांपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरण मैदानावर सुरू आहे.

(West Bengal Team Won 42th National Junior Archery Tournament)

भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे प्रतिनिधित्व केलेल्या पार्थ याला अंतिम लढतीत चंडीगडच्या दिव्यांश कुमार याने झुंजविले. 5-5 अशा बरोबरीनंतर वन-अॅरोज शूट-ऑफमध्ये पार्थचा अनुभव निर्णायक ठरला. महाराष्ट्राच्या तिरंदाजाने 10 गुणाचा, तर दिव्यांशने नऊ गुणाचा वेध घेतला. ब्राँझपदकाच्या लढतीत सेनादलाच्या यमन कुमार याने हरियानाच्या अभिजित मलिक याच्यावर मात केली.

National Archery Tournament
Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

मुलींच्या अंतिम लढतीत गुंचा हिने हरियानाच्या रिद्धी हिच्यावर 6-2 फरकाने मात करून सुवर्णपदक जिंकले. गुंचा हिची ही पहिलीच ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा आहे, तर रिद्धी हिच्यापाशी आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. ज्युनियर विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत रिद्धी हिचा भारतीय संघात समावेश होता. पंजाबच्या ईशा हिला ब्राँझपदक मिळाले, तिने एस. नागेश्वरी हिच्यावर मात केली.

National Archery Tournament
T20 World Cup: उपांत्य फेरीत टीम इंडिया या संघाशी भिडणार? बदलली समीकरणे

झारखंडला धक्का

मानांकनात सरस असलेल्या झारखंडला मिश्र गटातील अंतिम लढतीत धक्का बसला. सुवर्णपदक जिंकताना पश्चिम बंगालच्या अदिती जैसवाल व जुयेल सरकार यांनी पिछाडीवरून मुसंडी मारली. त्यांनी झारखंडवर 5-3 फरकाने मात केली. ब्राँझपदकाच्या लढतीत अव्वल मानांकित महाराष्ट्राने चंडीगडवर 5-3 फरकाने विजय नोंदविला.

गोव्याच्या रजनीकांतची छाप

फोंडा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) तिरंदाजी केंद्रात सराव करणाऱ्या गोव्याच्या रजनीकांत राजभर याने छाप पाडली. सेनादलात कार्यरत असलेल्या या तिरंदाजाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत साऱ्यांना चकीत केले. ही फेरी गाठताना त्याने झारखंडच्या अनुभवी मिरनल चौहान याला 6-2 फरकाने हरविले. नंतर रजनीकांतला सेनादलाच्या यमन कुमार याच्याकडून 2-6 फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com