Goa: कमजोर पंचगिरीमुळेच देशातील फुटबॉलचा दर्जा खालावलेला
चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) हे निस्सीम फुटबॉलप्रेमी (Football), खेळातील नियमांची त्यांना चांगलीच जाण आहे. आय-लीग (I-League) स्पर्धेत खेळणाऱ्या त्यांच्या चर्चिल ब्रदर्स संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली नाही, तर ते नेहमीच भारतीय पंचगिरीस (Referee) जबाबदार धरतात. आपल्या संघाची कामगिरी व्यवस्थित न झाल्याबद्दल ते पंचगिरीवर टीका करतात असे मानून चर्चिल यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आयएसएल स्पर्धेत खेळणाऱ्या संघांचे परदेशी प्रशिक्षकही भारतीय फुटबॉल पंचगिरीवर सातत्याने टीका करताना दिसतात. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेतील पंचगिरी खूपच वादग्रस्त ठरली होती. सध्या सुरु असलेल्या ड्युरँड कप स्पर्धेतील पंचगिरीबद्दल एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी जाहीर टीकास्त्र सोडले आहे. देशातील फुटबॉलच्या कमजोर दर्जास येथील पंचगिरीसही त्यांनी जबाबदार धरले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ मात्र पंचगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष लक्ष देत नसल्याचे जाणवते. असेही त्यांनी म्हणले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.