World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकून पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या 26व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान आहे.
Pakistan Cricket
Pakistan CricketDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या 26व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानने दोन बदल केले

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरने यावेळी सांगितले की, संघात दोन बदल करण्यात आले आहेत.

उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज उसामा मीरच्या जागी डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजचा संघात समावेश करण्यात आला असून वेगवान गोलंदाज हसन अलीच्या जागी मोहम्मद वसीम ज्युनियरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हसन अली तापामुळे खेळत नाही. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत. या सामन्यात रीझा हेंड्रिक्स, लिझार्ड विल्यम्स आणि कागिसो रबाजा खेळत नाहीत.

नियमित कर्णधार टेम्बा बावुमा, फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी आणि वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी संघात परतले आहेत.

Pakistan Cricket
World Cup 2023 :फलंदाजीचा क्रमांक बदलणे माझ्यासाठी धक्कादायक : स्टीव स्मिथ

दोन्ही संघांची प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान (Shadab Khan), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हारिस रौफ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com