World Cup 2023 :फलंदाजीचा क्रमांक बदलणे माझ्यासाठी धक्कादायक : स्टीव स्मिथ

दुखापतीमुळे आतापर्यंत संघाबाहेर राहिलेला हेड तंदुरुस्त झाला असून तो शनिवारी पहिल्यांदा या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे.
Steve Smith
Steve SmithDainik Gomantak

World Cup 2023 : नवी दिल्ली, न्यूझीलंडविरुद्ध येत्या शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी ट्रॅव्हिस हेड याला फलंदाजीच्या क्रमवारीत सामावून घेण्यासाठी मला खालच्या क्रमांकावर खेळावे लागेल, असा संदेश माझ्यासाठी काहीसा धक्कादायक होता, अशी कबुली स्टीव स्मिथने दिली.

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड हा महत्त्वाचा सामना शनिवारी होत आहे.

दुखापतीमुळे आतापर्यंत संघाबाहेर राहिलेला हेड तंदुरुस्त झाला असून तो शनिवारी पहिल्यांदा या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे.

स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा हुकमी फलंदाज असला तरी या विश्वकरंडक स्पर्धेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही; परंतु बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने ६८ चेंडूंत ७१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू आहे.

ट्रॅव्हिस हेड मूळचा सलामीवीर आहे, तो संघात परतल्यावर सलामीला खेळेल. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर किंवा मिचेल मार्श यापैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्यास स्मिथला चौथा क्रमांक मिळेल.

तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येताना वेगळी मानसिकता तयार करावी लागते.

ट्रॅव्हिस शनिवारच्या सामन्यात खेळला तर मला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल, असे मला कळवण्यात आले; असे स्मिथने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com