Video: आऊट होताच शादाब खानची शिवीगाळ, स्टम्प माईकमध्ये कैद झाली शिवी!

PSL 2023: पाकिस्तान संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शादाब खानने पीएसएल सामन्यात आऊट झाल्यानंतर शिवीगाळ केली.
Pakistan Team
Pakistan TeamDainik Gomantak
Published on
Updated on

PSL 2023, Shadab Khan Abuse Video: पाकिस्तान संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शादाब खानने पीएसएल सामन्यात आऊट झाल्यानंतर शिवीगाळ केली. त्याचे हे कृत्य क्रिकेटची प्रतिष्ठा पणाला लावणारे होते. त्याची ही शिवीगाळ स्टम्प माईकमध्ये कैद झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शादाब खानला (Shadab Khan) गोलंदाजाने बॉलिंग केली, ज्यानंतर तो संतापला आणि आऊट झाल्यानंतर शिवीगाळ केली. विशेष म्हणजे, त्याची ही शिवीगाळ स्टम्प माइकवरुन स्पष्टपणे ऐकू येते.

Pakistan Team
IPL vs PSL: IPL अन् PSL मध्ये कोणती लीग श्रेष्ठ? पाकिस्तानी क्रिकेटपटूने दिले खास उत्तर

या सामन्याचा व्हिडिओ

हा व्हिडिओ इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा आहे. पीएसएलचा हा 24 वा सामना होता, जो 7 मार्च रोजी रावळपिंडी येथे खेळला गेला. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा कर्णधार शादाब खानने असे कृत्य केले.

शादाब खान 24 चेंडूत 44 धावावर खेळत होता. 25व्या चेंडूवर मुलतान सुलतानचा गोलंदाज एहसानुल्लाहने डावाच्या 15व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याला बाद केले, त्यानंतर शादाब खान संतापला आणि त्याने अपशब्द वापरले.

इस्लामाबाद युनायटेडने सामना जिंकला

या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडने 2 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझावानच्या नेतृत्वाखालील मुलतान सुलतान संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धावा केल्या.

यामध्ये शान मसूदने 50 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. याशिवाय, टीम डेव्हिडचे आक्रमक रुपही पाहायला मिळाले. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार लगावत 60 धावा केल्या.

Pakistan Team
PSL 2022: शाहीन आफ्रिदीला मोठी भेट, कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी

इस्लामाबाद युनायटेडने धावांचा पाठलाग करताना 19.5 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. संघासाठी फहीम अश्रफने 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51* धावा केल्या. याशिवाय, कर्णधार शादाब खानने 44 आणि कॉलिन मुनरोने 40 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com