Hasaranga on no-ball controversy: अटीतटीच्या लढतीत नो-बॉलचा वाद; हसंरगा पंचाना म्हणाला, 'जमत नसेल, तर दुसरं काम करा'

Sri Lanka vs Afghanistan: अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात श्रीलंका अवघ्या 3 धावांनी पराभूत झाले. दरम्यान, या सामन्याच्या अखेरच्या षटकात नो-बॉलबाबत वादग्रस्त घटना घडली.
Wanindu Hasaranga
Wanindu HasarangaX/ICC
Published on
Updated on

Wanindu Hasaranga on no-ball controversy during Sri Lanka vs Afghanistan 3rd T20I Match:

बुधवारी (21 फेब्रुवारी) अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध तिसरा टी२० सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत व्हाइटवॉश टाळला. मात्र, या सामन्यादरम्यान एक मोठा वाद झाला असून त्यावर श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगाने खळबळजनक वक्तव्यही केले आहे.

त्याने या सामन्यातील पंच लिंनड हनिबल यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून म्हटले की त्यांनी दुसरे काम करायला हवे. या सामन्यातील अखेरच्या षटकात त्यांनी उंच फुट टॉसवर नो-बॉल न देता त्याला अधिकृत चेंडूचा करार दिल्याने हसरंगाने राग व्यक्त केला आहे.

झाले असे की अखेरच्या तीन चेंडूत श्रीलंकेला विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्यावेळी अखेरचे षटक अफगाणिस्तानकडून वफादार मोमंद टाकत होता, तर कामिंदू मेंडीस फलंदाजी करत होता

Wanindu Hasaranga
Wanindu Hasaranga: हसरंगाचा T20I मध्ये मोठा पराक्रम! 100 विकेट्स घेत मोडला दिग्गज मलिंगाचा विक्रम

मोमंदने या षटकात टाकलेला चौथा चेंडू खेळण्यासाठी कमिंदू मेंडिस क्रिजच्या बाहेर आलेला असला, तरी चेंडू टप्पा न पडला त्याच्या कमरेच्या वर होता. तो चेंडू मेंडिसच्या बॅटलाही लागला नाही. त्यामुळे मेंडिसला वाटले होते की त्यावेळी स्क्वेअर-लेगला असलेले पंच लिंडन हनिबल हा नो-बॉल देतील.

मात्र, त्यांनी हा चेंडू वैध ठरवला. ते पाहून अनेकजण चकीत झाले होते. मेंडिसने रिव्ह्युसाठीही विचारणा केली. मात्र फलंदाजाला अशाप्रकारासाठी रिव्ह्यू घेता येत नाही. तसेच मैदानावरील पंचही विकेटशिवाय नो-बॉलसाठी रिव्ह्यू घेत नाहीत.

आयसीसीच्या नियमानुसार गोलंदाजाने टाकलेला चेंडूची उसळी जर फलंदाजाच्या कंबरेच्या वर असेल, तर तो चेंडू नो-बॉल देण्यात येतो. मात्र, पंचांनी तो चेंडू वैध ठरवल्याने श्रीलंकेसमोर 2 चेंडूत 11 धावा असे समीकरण तयार झाले. त्यानंतर श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही आणि त्यांना 3 धावांनीच पराभव स्विकारावा लागला.

अवघ्या 3 धावांनी पराभव मिळाल्याने त्या चेंडूचे महत्त्व वाढले होते. दरम्यान, सामन्यानंतर हसरंगाने त्याची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

Wanindu Hasaranga
IND Vs ENG: टीम इंडियाला झटका, चौथ्या कसोटी सामन्यातून बुमराह अन् KL राहुल बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

हसरंगा म्हणाला, 'अशाप्रकारच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय सामन्यात होणे चूकीचे आहे. जर चेंडू कंबरेच्या आसपास असता, तर काही समस्या नव्हती. पण चेंडूची उंची खूप होती. जर अजून थोडा चेंडू वर असता, तर तो चेंडू फलंदाजाच्या डोक्यालाही लागला असता.'

'जर तुम्ही ते पाहू शकत नसाल, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे पंच योग्य नाहीत. त्यांनी दुसरे काहीतरी काम करणेच योग्य असेल.'

त्याचबरोबर फलंदाजाला नो-बॉलसाठी रिव्ह्यू घेता न येण्याबद्दलही हसरंगाने प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'आधी अशी परिस्थिती होती की तुम्ही अशावेळी रिव्ह्यू घेऊ शकत होता, पण आयसीसीने तो नियम हटवला. आमच्या फलंदाजाने रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला होता. जर थर्ड अंपायर पायाचा नो-बॉल पाहू शकतात, तर त्यांनी अशाप्रकारचे नो-बॉलही पाहायला हवेत. ते असं का करत नाहीत, यामागे काही कारण नाहीये. मला माहित नाही, त्यावेळी पंचांच्या डोक्यात काय विचार होता.'

दरम्यान, या मालिकेतील पहिले दोन सामने श्रीलंकेने जिंकले होते. त्यामुळे त्यांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com