World Cup 2023: मुलतानच्या सुलतानची भविष्यवाणी, यंदाच्या वर्ल्ड कपचा किंग बनणार 'हा' खेळाडू

ICC ODI World Cup 2023: आयसीसी वर्ल्ड कप 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI World Cup 2023: आयसीसी वर्ल्ड कप 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. संपूर्ण वर्ल्ड कप भारतात खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. सेहवागने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तूफानी शतके झळकावणाऱ्या आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.

मुलतानच्या सुलतानची भविष्यवाणी

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) आशा आहे की, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके आणि धावा करणारा फलंदाज विराट बनेल. 2011, 2015 आणि 2019 नंतर विराट कोहली चौथा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने 9 डावात 55.37 च्या सरासरीने 443 धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश होता.

सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, 'विराटने 2019 वर्ल्ड कपमध्ये एकही शतक झळकावले नाही. मात्र, या वर्षी मला आशा आहे की, तो अनेक शतके झळकावत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

आशा आहे की, भारत (India) यंदाचा वर्ल्ड कप जिंकेल आणि नंतर, मला त्याला माझ्या खांद्यावर घेऊन मैदानात फिरायचे आहे. जसे 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये क्रिकेटच्या देवाला (सचिन तेंडुलकर) खांद्यावर घेऊन मैदानात फिरवण्यात आले होते.'

Team India
World Cup 2023: वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळताच किंग कोहली करणार मोठा कारनामा, क्रिकेटचा देव 'या' लिस्टमध्ये अव्वल!

रोहित-विराट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी...

सेहवाग पुढे म्हणाला की, कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा आगामी स्पर्धा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील. 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग रोहित भाग नव्हता. मात्र, आता मायदेशात होणाऱ्या यंदाच्या वर्ल्ड कपसाठी तो टीम इंडियाचा कर्णधार आहे.

Team India
Cricket World Cup 2023: सलग तिसऱ्या वर्ल्डकपमध्येही संघात निवड नाही; आता याची सवयच झालीय...

पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध

1983 आणि 2011 चा चॅम्पियन असलेला भारत 8 ऑक्टोबर रोजी एमए चिदंबरम, चेन्नई येथे पाचवेळचा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. एक दशकापासून सुरु असलेला जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ यंदा टीम इंडियाने संपवावा, अशी सेहवागची इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com