टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटूच्या (Virat Kohli) मुलीला ऑनलाइन बलात्काराची धमकी देण्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली असून, पोलिसांनी हैद्राबाद येथून एकाला अटक केली आहे. पोलीस संबंधित आरोपींना मुंबईत आणत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. यावर एका व्यक्तीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मुलीला ऑनलाइन धमकी दिली. या प्रकरणाचा तपास मुंबई सायबर सेलकडे सोपवण्यात आला होता. नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार पोलिसांनी आरोपीला हैदराबाद येथून अटक केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनागेश अलीबथिनी अशी आरोपीची ओळख आहे.
दिल्ली महिला आयोगाने पोलिसांकडून मागवली माहिती
दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला पत्र लिहून धमकी प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. डीसीडब्ल्यू प्रमुखांनी या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरबाबत दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवली होती. त्यात म्हटले आहे की, आयोगाला हे जाणून घ्यायचे आहे की या प्रकरणात कोणते आरोपी ओळखले गेले आणि त्यांना अटक करण्यात आली. मालिवाल यांनी म्हटले आहे की, जर अटक झाली नसेल, तर दिल्ली पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती द्यावी.
काय प्रकरण आहे?
मालीवाल यांच्या पत्रानुसार, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर विराटच्या 9 महिन्यांच्या मुलीला ऑनलाइन बलात्काराच्या धमक्या येत आहेत. त्याने लिहिले आहे की, विराटवर देखील हल्ला होत आहे कारण तो धर्माच्या आधारावर आपल्या संघातील सदस्य मोहम्मद शमीला लक्ष्य करण्याच्या विरोधात बोलला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.