भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गेल्या महिन्यात IPL इतिहासातील दोन सर्वात महागड्या फ्रँचायझींचा लिलाव केला. लखनौसाठी सुमारे 7 हजार कोटी आणि अहमदाबादसाठी 5 हजार कोटींहून अधिक दोन नवीन संघांची बोली लावण्यात आली. यासह, 14 वा हंगाम जगातील सर्वात मोठा T20 लीग बनला असून आता त्यातील संघांची संख्या 10 झाली आहे. साहजिकच आयपीएलची वाढती व्याप्ती भारताच्या देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी चांगली आहे, परंतु यासोबतच पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर, बीसीसीआय महिला आयपीएल कधी सुरु करणार? या प्रश्नावर बोर्ड काहीच बोलत नाही. मात्र शेजारील देशाचे बोर्ड या प्रकरणी बीसीसीआयला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) लवकरच महिला पाकिस्तान सुपर लीग (Women’s IPL) सुरु करण्याची योजना आखत आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष, रमीझ राजा (Rameez Raja) यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध T20 लीग, PSL ची महिला आवृत्ती देखील आमच्या योजनांचा एक भाग आहे. आयपीएलच्या यशाने प्रभावित होऊन जवळपास 8 वर्षांनंतर सुरु झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये जगातील अनेक मोठे खेळाडू खेळणार आहेत. अशा परिस्थितीत लीगच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी आणि महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पीसीबी महिला पीएसएल सुरु करण्याचा विचार करत आहे. आतापर्यंत, फक्त महिला बिग बॅश लीग ऑस्ट्रेलियामध्ये आणि महिला टी-20 ब्लास्ट आणि द हंड्रेड इंग्लंडमध्ये खेळली जात आहे.
U-19 आणि महिला PSL च्या तयारीत PCB
सप्टेंबरमध्ये पीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या रमीझ राजा यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये घोषणा केली आहे की, आमचे बोर्ड महिला पीएसएलच्या योजनेवर काम करत असून अशी लीग सुरु करणारा आशियातील पहिला बोर्ड असेल. केवळ महिला पीएसएलच नाही तर या वर्षापासून पीसीबी अंडर-19 पीएसएलही सुरु करणार आहे. रमीझ पुढे म्हणाले, “ऑक्टोबरमध्ये आम्ही अंडर-19 पीएसएल लाँच करु. यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. असे जगात अद्याप कुठेही घडलेले नाही. इंग्लंडचे खेळाडू जेव्हा येतील तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेऊ. याशिवाय महिला पीएसएलही माझ्या मनात असून आशिया खंडात सुरु करणारे आम्ही पहिले क्रिकेट बोर्ड असू.
बीसीसीआयने 3 संघांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते
पीसीबीची ही घोषणा बीसीसीआयला महिला आयपीएल सुरू करण्यासाठी आव्हान देणार की प्रेरणा देणार, हे येणाऱ्या काळातच कळेल. 2019 आणि 2020 च्या आयपीएल हंगामात प्लेऑफ सामन्यांदरम्यान खेळल्या गेलेल्या महिला T20 लीगच्या नावाने भारतीय मंडळाने आतापर्यंत केवळ दोनदा महिला चॅलेंजर टी-20 स्पर्धेचे आयोजन केले आहे. केवळ 3 संघ असलेल्या त्या स्पर्धेत दोन्ही वर्षात एकूण 4-4 सामने खेळले गेले. जागतिक क्रिकेटच्या अनेक महिला क्रिकेटपटूंनी महिलांच्या आयपीएलबद्दल बोलले आहे आणि आता भारतीय टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंनीही ते आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.