IND vs AFG: ''माही भाईकडून जे शिकलो तेच केले...''; पहिल्या T20 नंतर शिवम दुबेने केला मोठा खुलासा

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळला गेला.
Shivam Dube  And Dhoni
Shivam Dube And Dhoni Dainik Gomantak

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिवम दुबेने संघासाठी दमदार अर्धशतक झळकावले. या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. मोहालीतील सामन्यात 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 17.3 षटकात सामना जिंकला. शिवमने निर्णायक खेळी खेळली. त्याने 38 चेंडूत अर्धशतक केले. शिवमने या सामन्यात 40 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली.

दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या (India) विजयाचा हिरो अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ठरला. सामन्यावंतर तो म्हणाला की, 'सामना कसा संपवायचा हे मी महेंद्रसिंग धोनीकडून (माही भाई) शिकलो आहे.'

सामनावीर शिवम दुबे म्हणाला की, “मी खूप दिवसांपासून संधीची वाट पाहत होतो. मी स्वत:ला तयार ठेवत होतो, जेणेकरुन संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करता येईल. जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा मी माही भाई (एमएस धोनी) कडून जे शिकलो तेच केले.''

Shivam Dube  And Dhoni
IND vs AFG: 'मोठे सिक्स मारू शकतो, त्यामुळे कधीही धावा...', सामनावीर शिवम दुबेचं मोठं भाष्य

फलंदाजीतील बदलाबाबत दुबे म्हणाला की, ''मी सतत माही भाईशी बोलतो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना कसा करायचा हे ते मला सांगतात. त्यांनी मला दोन ते तीन असे सल्ले दिले आहेत आणि माझ्या फलंदाजीला रेट केले आहे. त्यामुळे मला वाटते की जर ते माझ्या फलंदाजीला रेट करत असतील तर मी चांगली कामगिरी करत राहीन. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्याचबरोबर मी खूप दिवसांपासून माझ्या गोलंदाजीवर काम करत आहे. हा बदल अचानक आलेला नाही. मी संधीची वाट पाहत होतो आणि आज संधी मिळाल्यावर मी चांगली कामगिरी केली.''

तो पुढे म्हणाला की, "रोहित भाईने मला परिस्थितीनुसार फलंदाजी करण्यास सांगितले आणि माझ्यावर विश्वास दाखवला केला की आपण कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकू शकतो. मोहालीत खूप थंडी होती, त्यामुळे बॅटींग करायला गेल्यावर मला बॅटही धरताही येत नव्हती, पण दोन-तीन चेंडू खेळून झाल्यावर मी सेट झालो होतो.''

तो पुढे असेही म्हणाला की, “मी बराच काळ गोलंदाजी करत होतो आणि मला वाटले की मी चांगली कामगिरी करत आहे. ऑफ सीझनमध्येही मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आणि त्याचाच आज मला फायदा झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्येही मी माझ्या गोलंदाजीत खूप सुधारणा केली. आज मी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली आणि मला चांगली गतीही मिळाली.''

Shivam Dube  And Dhoni
IND Vs AFG: अफगाणिस्तानने भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कामगिरी; 14 वर्षे जुन्या विक्रमाशी साधली बरोबरी

तो पुढे म्हणाला की, रोहित भाईने मला सांगितले होते की, स्थिती लक्षात घेऊन ते मला गोलंदाजी करण्यास बोलवतील. पण संधी मिळाल्यावर मला बरे वाटले. आगामी T20 विश्वचषकाबाबत तो म्हणाला की, "विश्वचषक (World Cup) खेळणे आणि विजयात हातभार लावणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण अजून बराच वेळ आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com