ICC ODI Cricket World Cup 2023, Australia all wickets against India:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारी झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 200 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकात 199 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण, ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट तिसऱ्याच षटकाच जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर गमावली, मिचेल मार्श शुन्यावर बाद झाला.
मात्र, त्यानंतर कुलदीप यादवने 17 व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत वॉर्नरला 41 धावांवर बाद केले. यानंतर स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन यांचा अडथळा रविंद्र जडेजाने दूर केला. त्याने 28 व्या षटकात स्मिथला 46 धावांवर त्रिफळाचीत केले, तर 30 व्या षटकात लॅब्युशेनला २७ धावांवर आणि ऍलेक्स कॅरेला शुन्यावर माघारी धाडले.
यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मॅक्सवेलला 36 व्या षटकात कुलदीप यादव 15 धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच षटकात ग्रीनला आर अश्विनने 8 धावांवर माघारी धाडले.
त्यांनंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने झुंज दिली. ते धावा जोडत असतानाच कमिन्सला ४३ व्या षटकात १५ धावांवर जसप्रीत बुमराहने बाद केले. त्याने शानदार झेल श्रेयस अय्यरने घेतला.
पण यानंतरही झम्पाने 20 चेंडूत खेळत स्टार्कला साथ दिली होती. पण अखेर 49 व्या षटकात 6 धावांवर झम्पाला हार्दिक पंड्याने विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले. अखेरीस स्टार्कची विकेट शेवटच्या षटकात सिराजने घेतली. तो 28 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.